Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर आधी अत्याचार नंतर गर्भपात; आरोपीवर गुन्हा दाखल

मेट्रोमोनियल साईटवरून ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, लैंगिक अत्याचार केले. गरोदर राहिलेल्या तरुणीचा गर्भपात करून शरीर संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार जानेवारी 2022 ते 17 जून 2023 याकालावधीत ताथवडे, तळेगाव दाभाडे आणि आरोपीच्या कारमध्ये घडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 23, 2023 | 02:57 PM
लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर आधी अत्याचार नंतर गर्भपात; आरोपीवर गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

पिंपरी : मेट्रोमोनियल साईटवरून ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, लैंगिक अत्याचार केले. गरोदर राहिलेल्या तरुणीचा गर्भपात करून शरीर संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार जानेवारी 2022 ते 17 जून 2023 याकालावधीत ताथवडे, तळेगाव दाभाडे आणि आरोपीच्या कारमध्ये घडला.

आकाश शंकर जगदाळे (32, रा. काडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय पिडीत तरुणीने शुक्रवारी (दि. 23) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी आकाश यांची शादी डॉट कॉम या मेट्रोमोनियल साईटवरून ओळख झाली. आकाशने शादी डॉट कॉमवर फिर्यादी यांचे प्रोफाईल पाहून त्यांचा नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्या दरम्यान फिर्यादी गरोदर राहिल्या. त्यानंतर आकाश याने ‘तू जर गर्भपात केलातरच मी तुझ्याशी लग्न करेन. अन्यथा मी तुझ्याशी लग्न करणार नाही’ अशी धमकी दिली.

फिर्यादीच्या मनाविरुद्ध गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादीने आकाशकडे लग्नाबाबत विचारणा केली असता आकाशने फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यांचा शारीरिक संबंध करतानाचा व्हिडीओ आकाशने फिर्यादीस दाखवला. ‘तू जर मला त्रास दिला तर मी तुझे व्हिडीओ व्हायरल करेन’ अशी त्याने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A young woman is first raped and then aborted by luring her into marriage a case has been registered against the accused nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2023 | 02:57 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pimpri
  • Rep

संबंधित बातम्या

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये
1

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
2

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

सिन्नरजवळ गोंदे-दातली मार्गावर भीषण अपघात; कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू
3

सिन्नरजवळ गोंदे-दातली मार्गावर भीषण अपघात; कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू

Maharashtra Weather Update:  महाराष्ट्रात हवामानाचा मूड बदलणार! ‘या’ 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा
4

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात हवामानाचा मूड बदलणार! ‘या’ 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.