Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनायक मेटेंचा अपघात नसून घातपात? मेटेंच्या आईंनी व्यक्त केला ‘हा’ संशय

विनायक मेटे यांच्या मातोश्री लोचनाबाई मेटे (Matoshree Lochanabai Mete) यांनी माझा मुलगा अपघातात गेला नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. माझ्या मुलाला मारले आहे, हा डाव होता असा सुद्धा आरोप मातोश्री लोचनाबाई मेटे यांनी केला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 15, 2022 | 08:14 PM
विनायक मेटेंचा अपघात नसून घातपात? मेटेंच्या आईंनी व्यक्त केला ‘हा’ संशय
Follow Us
Follow Us:

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Marath reservation) लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे रविवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटे अपघाती निधन झाले. (Accident in Mumbai pune highway) त्यानंतर अवघ्या वयाच्या ५२ वर्षी हा मराठा योद्धा काळाच्या पडद्याआड गेल्यानं सर्वांनी हळहळ व्यक केली. त्यानंतर मेटे यांचे पार्थिव बीड (Beed) येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी रात्री उशिरा आणले. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मारण्याचा डाव होता असा संशय निर्माण होत असून, गाडीचा चालक (Driver) बेपत्ता झाल्यामुळं हा अपघात होता की, घातपात अशा दबक्या आवाजात चर्चा होत आहेत. त्यानंतर आता विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईंनी (Mother) वेगळा संशय व्यक्त केला आहे.

[read_also content=”मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर उद्या कोविड लसीकरण बंद https://www.navarashtra.com/maharashtra/tomorrow-will-be-covid-centre-closed-in-mumbai-316513.html”]

दरम्यान, विनायक मेटे यांच्या मातोश्री लोचनाबाई मेटे (Matoshree Lochanabai Mete) यांनी माझा मुलगा अपघातात गेला नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. माझ्या मुलाला मारले आहे, हा डाव होता असा सुद्धा आरोप मातोश्री लोचनाबाई मेटे यांनी केला आहे. माझं लेकरु अपघाताने गेलं नाही, त्याला मारलं आहे. माझं लेकरु मरायसारखा नव्हता. जाणून बुजून माझं लेकरु मारलं, त्याची चौकशी करा, असं म्हणत या माऊलीने टाहो फोडला. मेटेंच्या आईंनी निर्माण केलेल्या संशयामुळं चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

Web Title: About vinayak mete accident doubt create mother lochanabai mete

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 08:14 PM

Topics:  

  • Mumbai-Pune Highway
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • vinayak mete

संबंधित बातम्या

Mumbai-Pune Highway: जुना मुंबई-पुणे महामार्ग अंधारात! देहूरोड ते वडगाव फाट्यावरील बंद पथदिव्यांमुळे अपघाताचा धोका 
1

Mumbai-Pune Highway: जुना मुंबई-पुणे महामार्ग अंधारात! देहूरोड ते वडगाव फाट्यावरील बंद पथदिव्यांमुळे अपघाताचा धोका 

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
2

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
3

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
4

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.