औरंगाबाद : जिल्ह्यातील बिडकीन-शेकटा मार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास हा अपघात घडला.
बिडकीन जवळील शेकटा रोडवरील खताच्या कंपनीसमोर दुचाकी (MH 20 GB 8483), (MH 23 R 9968) जात असतांना हायवा ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन युवक जागेवरच ठार झाले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दत्तात्रय कैलास गावंडे (वय 30 वर्षे, रा.पिशोर,ता.कन्नड), ज्ञानेश्वर उबाळे ( वय 30 वर्षे, रा. अंधारी, तालुका सिल्लोड), गजानन विश्वनाथ बडक (वय 20 वर्षे, पळशी, तालुका सिल्लोड) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
[read_also content=”साबरमती नदीवर साकारण्यात आलाय सुंदर अटल पूल, फोटो बघितले का ? https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-modi-to-inaugarate-atal-bridge-of-sabarmati-river-nrsr-319873.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील तिघेही तरुण हे बिडकीन जवळील एका खासगी कंपनीतील कामागार असुन शिफ्ट सुटल्यानंतर दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून घरी निघाले होते. दरम्यान याचवेळी तेथून जाणाऱ्या हायवा ट्रकने दोन्ही मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तात्काळ औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्याचा त्याचाही मृत्यू झाला आहे.
[read_also content=”भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत लाखोंच्या घरात https://www.navarashtra.com/sports/india-pakistan-match-tickets-cost-in-lakhs-319865.html”]