Photo Credit- Social Media
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (23 नोव्हेंबर) होणार आहे.निवडणुकांच्या मतदानानंतर राज्यात विविध संस्थानी एक्झिट पोलही जाहीर केले. यातील बहुतांश पोल्समधील आकडेवारूनुसार महाराष्ट्रात महायुती बहुमताचा आकडा पार करेल आणि सत्ता स्थापन करेल, असा दावा करण्यात येत आहे.
अशातच प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे.प्रजातंत्रच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महायुतीला फक्त 127 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडी बहुमताचा आकडा पार करून सरकार स्थापन करू शकते.
महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळेल. मुंबईत 18, पश्चिम महाराष्ट्रातील 30, मराठवाड्यात 30 जागा, ठाणे आणि कोकणात 17, मराठवाड्यातील 30, उत्तर महाराष्ट्रात 23, विदर्भात 31 आणि जागा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील 288 पैकी 127 विधानसभा मतदारसंघात महायुतीला विजय मिळेल. इतक्या जागा मिळाल्यानंतर भाजप अपक्ष आणि बंडखोरांच्या मदतीने बहुमताचा आखडा गाठण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्यासाठी घोडेबाजार होणार का, याबाबतही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रजांतंत्रच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मुंबईत 18, पश्चिम महाराष्ट्रात 26 जागा, मराठवाड्यात 15 जागा, उत्तर महाराष्ट्र 21 जागा, विदर्भ 29 जागा आणि ठाणे-कोकण 18 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
झॅगल प्रिपेड ओशियन सर्व्हिसेस लिमिटेडची सप्टेंबर तिमाहीत दमदार कामगिरी !
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मतदानाचा टक्काही वाढला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत गेल्या 30 वर्षांमधील मतदानाचा विक्रम मोडला आहे. लोकसभा निवडणुकीत 61 टक्के मतदान झाले होते. पण विधानसभा निवडणुकीत राज्यभरात सरासरी 66.05 टक्के मतदान झाले आहे. हे वाढलेले मतदान कुणासाठी फायदेशीर ठरणार, हे निकालाच्या दिवशी ठरणार आहे. पण निवडणुकीत वाढलेला मतदानाच टक्का हा प्रस्थापित सरकारच्या विरोधात मानला जातो. पण दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या यशामुळेयंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आ. अनेक बड्या नेत्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. कोल्हापुरच्या कागलमध्येही सर्वाधित मतदान झाले. कागल मतदारसंघात तब्बल 81 टक्के मतदान झाले आहे. तर मुंबईत मुंबईत फक्त 52 टक्के मतदान झाले.