Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खून करुन पळालेल्या आराेपींना रेल्वेतून घेतले ताब्यात; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दिवसापूर्वी एका २८ वर्षीय तरुणाचा खून करून पाच आरोपी पसार होत होते. पोलिसांनी श्रीगोंदा रेल्वे स्टेशनला धाव घेऊन निजामबाद ते पुणे डेमो एक्सप्रेस या गाडीची तपासणी केली असता, खूनातील पाच आरोपींना रेल्वेमधून ताब्यात घेतले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 29, 2022 | 06:34 PM
खून करुन पळालेल्या आराेपींना रेल्वेतून घेतले ताब्यात; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

श्रीगोंदा : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दिवसापूर्वी एका २८ वर्षीय तरुणाचा खून करून पाच आरोपी पसार होत असल्याबाबतची माहिती श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना समजताच त्यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना माहिती दिली. त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने श्रीगोंदा रेल्वे स्टेशनला धाव घेऊन ठीक चार वाजता निजामबाद ते पुणे डेमो एक्सप्रेस या गाडीची तपासणी केली असता, खूनातील पाच आरोपींना रेल्वेमधून श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिरली या गावातील मन्मथ ईरवंत धोंडापुरे (वय २८ वर्ष) यांचे गावातील काही तरुणांचे किरकोळ भांडण झाले होते. या प्रकरणात गावातील माजी तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी पाटील चव्हाण यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यातील प्रमुख आरोपी बालाजी ढगे, मन्मथ यांना जीवे मारण्याची धमकी देत होता. (दि २६) ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मन्मथ यास आरोपी बालाजी ढगे, बंटी ढगे, कृष्णा ढगे, गोविंद ढगे, सचिन खंडगावे, या पाचही जणांनी लाकडी दांडक्याने, कोयता, तसेच धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर प्रहार करून ठार मारले. आणि बाळासाहेब चव्हाण यांच्या शेतात फेकून दिले. पोलिसांनी पकडू नये म्हणून ते रेल्वेने पसार झाले. या घटनेची माहिती संदीप मस्के श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना माहिती समजतात आरोपी हे पुण्याकडे जाऊ शकतात अशी माहिती समजताचं त्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना माहिती दिली.

जानकर व पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी विलंब न लावता पंधरा पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन श्रीगोंदा रेल्वे स्टेशन तात्काळ गाठले. त्याक्षणी पुण्याकडे जाणारी निजामबाद एक्सप्रेस येताचं जानकर व अभंग यांनी दोन तीन पोलिसांचे पथक तयार करून सर्व रेल्वे डब्यांची तपासणी केली असता, खून करणारे पाचही आरोपी मिळून आले. व तसे आरोपींनी आम्हीचं खून केला आहे अशी कबुली दिली.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे स पो नि महेश जानकर, पोसई समीर अभंग, स फो विठ्ठल बडे, पो कॉ. मुकेशकुमार बडे, भरत खारतोडे, संभाजी गर्जे , दादासाहेब टाके, किरण बोराडे, विनायक जाधव, योगेश सुपेकर, राजु भोर, संभाजी घोडे, दादाराम म्हस्के यांनी कामगिरी केली.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दिवसापूर्वी खून करून पाच आरोपी रेल्वेने पुण्याकडे पळून जात असलाची माहिती समजतात अगदी काही मिनिटातच श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले. या कामगिरीबद्दल अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला व नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्ष यांनी श्रीगोंदा पोलिसांचे कौतुक केले.

मयत मन्मथ ईरवंत धोंडापुरे हा आमच्या भागातील मोठा गुंड होता, त्याचे वडील देशी विदेशी दारू विक्री करतात. त्यामुळे आमच्या भागात त्याची दहशत होती. आम्हा सर्वांना त्याने एकएकाला गाठून मारहाण केली आहे. या गुंडाला आम्ही कायमचा संपवला याचा आम्हाला आनंद आहे. आत्ता आम्ही पोलिसांना शरण जाणार आहे, असे पाचही आरोपींनी सांगितले.

Web Title: Accused who escaped after murder were taken into custody by train action of srigonda police nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2022 | 06:30 PM

Topics:  

  • ahmednagar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Shrigonda

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
1

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
2

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
3

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
4

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.