Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांबड्या मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल खात्याची कारवाई

पाटण तालुक्यात विविध ठिकाणच्या भागात शासनाच्या विविध अभियानातील प्रकल्पात लागणारे दगड माती भरावाला पुरवण्याच्या नावाखाली गौण खनिज उत्खनन चालू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2026 | 01:43 PM
तांबड्या मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई;

तांबड्या मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई;

Follow Us
Follow Us:

मल्हारपेठ : पाटण तालुक्याच्या कोयना काठावरून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे माती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याच्या चर्चा आहेत. असे असताना एका डंपरवर महसूल खात्याने कारवाई केली व तो डंपर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे. अशाच एका तक्रारीनंतर प्रशासनाला माहिती मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या मातीमाफियांना पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

पाटण तालुक्यात विविध ठिकाणच्या भागात शासनाच्या विविध अभियानातील प्रकल्पात लागणारे दगड माती भरावाला पुरवण्याच्या नावाखाली गौण खनिज उत्खनन चालू आहे. तालुक्यात वीट भट्टी व्यवसाय, रस्त्याची कामे याशिवाय अनेक ठिकाणी सुरू असलेली भरावाची काम यासाठी मातीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता भरमसाठ उत्खनन अनेक ठिकाणी सुरू असल्याचे बोलले जाते. यासाठी कोयना काठ पोखरला जात असून, माती उत्खनन आणि उत्खनन केलेल्या मातीची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

दौंड तालुक्यात भेसळयुक्त गुळाचा काळा धंदा, दारूसाठी परराज्यात पुरवठा; विनापरवाना गुऱ्हाळांवर कारवाईची मागणी

तालुक्यात अनेक भागात जेसीबी, पोकलनच्या साह्याने दररोज शेकडो ब्रास माती उत्खनन होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे शासनाची कोणतीही परवानगी न घेता आवश्यक ती रॉयल्टी न भरता माती उत्खनन सुरू असून, संबंधित विभागातील तलाठी आणि मंडल अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा नोटीस पाठवत नसल्याने शासनाची तिजोरी मात्र रिकामी राहत आहे.

दिवसाढवळ्या उत्खनन सुरू

काही वेळेस दिवसाढवळ्या उत्खनन सुरू असूनदेखील ठोस कारवाई होत नाही. तर काही ठिकाणी जुजबी रॉयल्टी घेऊन त्यापेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन सुरू आहे. लाल मातीचे भरुन चाललेले डंपर एकापाठोपाठ एक रस्त्यावरुन कराडच्या दिशेने जातात. काही वेळेला रात्री व पहाटेच्या वेळी अशी वाहतूक सुरू असल्याचे बोलले जाते. नुकतेच मल्हारपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या लाल मातीची वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल विभागाने कारवाई केल्याने अशा प्रकारांना दुजोरा मिळत आहे.

Web Title: Action taken against a dumper illegally transporting red soil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत
1

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक
2

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश
3

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान
4

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.