फोटो सौजन्य - iStock
यवतमाळ जिल्ह्यातील बाेरगाव पुंजी गावात एका बोगस डॉक्टराने त्याचा दवाखाना सुरु केला होता. मिथुन बिस्वास असे या बोगस डॉक्टर असणाऱ्या तरूणाचे नाव आहे. मिथुन बिस्वास काेलकाता येथील रहिवासी आहे. त्याने काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथे त्याचा दवाखाना सुरु केला. तो डॉक्टर बनून गावातील गरीब ग्रामस्थांवर उपचार करत होता. बाेरगाव पुंजी गाव यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्याच्या दुर्गम भागातील भांबाेरा प्राथमिक आराेग्य केंद्रातंर्ग येते. त्यामुळे येथील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या बोगस डॉक्टराविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मिथुन बिस्वास या बोगस डॉक्टराच्या दवाखान्यावर छापा टाकला. यावेळी चौकशी केली असता मिथुन बिस्वासकडे दवाखान्या संबंधित कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. या छापेमारीत पोलिसांनी बोगस डॉक्टराकडून सुमारे ११ हजारांची औषधे जप्त केली. भांबाेरा आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी शुभम संजय वाडेवाले यांनी बोगस डॉक्टर मिथुन बिस्वास विरोधात घाटंजी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बोगस डॉक्टर मिथुन बिस्वास विरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं. मात्र यानंतर काही तासांतच आरोपी मिथुन बिस्वासला सूचना पत्र देऊन साेडून देण्यात आलं.
बाेरगाव पुंजी गावात कोलकाताहून आलेल्या मिथुन बिस्वासने त्याचा दवाखाना सुरु केला होता. तो गावातील गरीब नागरिकांवर उपतार करत होता. मात्र हा दवाखाना सुरु करण्यासाठी आरोपी मिथुन बिस्वासकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नव्हती. तसेच त्याच्याकडे डॉक्टर असल्याचा कोणाताही पुरावा देखील नव्हता. ही गोष्ट लक्षात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मिथुन बिस्वास या बोगस डॉक्टराविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मिथुन बिस्वासच्या दवाखान्यावर छापा टाकला. यानंतर कारवाई करत पोलिसांनी मिथुन बिस्वासला ताब्यात घेतलं होतं. त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र काही तासांतच आरोपी मिथुन बिस्वासला साेडून देण्यात आलं.