घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. मात्र, प्रत्यक्षात वाळू उपलब्ध न झाल्याने अनेक लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम रखडले आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील लाभार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन देत तातडीने वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली. लाभार्थ्यांनी सांगितले की, सध्या देवगड येथील वाळू पट्ट्यातून वाळू आणणे अत्यंत खर्चिक ठरत आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील नेरुर येथून वाळू उपलब्ध करून दिल्यास घरकुल बांधकामाचा वेग वाढेल. प्रशासनाने तातडीने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.