शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ०५ ते ०८ नोव्हेंबर असे चार दिवस अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याचा संवाद दौरा करणार आहेत. ०५ तारखेला धाराशिव जिल्ह्यातून हे दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. ०६ नोव्हेम्बरला ते लातूर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर येथे येणार असल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी लातूरमध्ये दिली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झाली मात्र अद्याप मदत न मिळाल्याचा जाब उद्धव ठाकरे संवाद दौऱ्यातून विचारणार आहेत. कऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशासाठी हवाय ? ०६ मिनिटात यावर निर्णय होऊ शकतो. मात्र सरकारच्या या सर्व भूलथापा असल्याची टीकाही दानवे यांनी केली. प्रहारचे नेते बच्चू कडू जर मंत्री असते त्यांनी आंदोलन केले असते का असा सवालही यावेळी अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. दरम्यान आय लव्ह मोहंमद वरूनही त्यांनी भाजपसह अनेकांना फटकारले आहे. जर जय श्रीराम चालतो, गणपती बाप्प्पा मोरया चालतो तर आय लव्ह मोहंमद वर आक्षेप का असा सवाल ही दानवे यांनी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना उपस्थित केलाय.