Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: दर्जेदार बियाण्यांसाठी राष्ट्रीय संस्थांशी करार! आता हवामानानुकूल व अधिक उत्पादनक्षम वाण उपलब्ध होणार

स्पीड ब्रीडिंग, बियाणे गुणवत्ता प्रयोगशाळा, उपग्रहाधारित निरीक्षण, प्रतिमाधारित विश्लेषण आणि कृषी अवजारे प्रयोगशाळांची पाहणी करून अशा आधुनिक सुविधा महाबीजमध्ये उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला. पिकांव्या अवशेषांपासून सेंद्रिय खत व बायोचार निर्मितीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2026 | 02:00 PM
दर्जेदार बियाण्यांसाठी राष्ट्रीय संस्थांशी करार! आता हवामानानुकूल व अधिक उत्पादनक्षम वाण उपलब्ध होणार

दर्जेदार बियाण्यांसाठी राष्ट्रीय संस्थांशी करार! आता हवामानानुकूल व अधिक उत्पादनक्षम वाण उपलब्ध होणार

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दर्जेदार, अधिक उत्पादनक्षम, हवामानानुकूल बियाणे व कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) देशातील नामांकित संशोधन संस्थांशी सहकार्याची भूमिका घेतली आहे. यासाठी महाबीजच्या अधिकाऱ्यांनी वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्था (आआयव्हीआर), राष्ट्रीय बीज संशोधन व प्रशिक्षण केंद्र (एनएसआरटीसी) आणि आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्र (आयआरआरआय) येथे भेटी देऊन शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली.(फोटो सौजन्य – AI)

आदिवासींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन! समाजाच्या विविध मागण्या; आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी आणि महाव्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण व संशोधन) डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी २० व २१ ऑगस्टला या संस्थांना भेट दिली. धान पिकातील कमी कालावधीत येणारे तसेच सुपरफाईन वाणांचे पैदासकार बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत आयआरआरआयच्या शास्त्रज्ञांशी चर्चा झाली. महाबीजव्या गरजेनुसार संबंधित संस्थेकडून संशोधन सुरू असून, लवकरच आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. धान संशोधनासाठी आवश्यक जननद्रव्य आणि तांत्रिक सहकार्य मिळविण्यासाठी महाबीज आयआरआरआय यांच्यात सामंजस्य करार करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

स्पीड ब्रीडिंग, बियाणे गुणवत्ता प्रयोगशाळा, उपग्रहाधारित निरीक्षण, प्रतिमाधारित विश्लेषण आणि कृषी अवजारे प्रयोगशाळांची पाहणी करून अशा आधुनिक सुविधा महाबीजमध्ये उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला. पिकांव्या अवशेषांपासून सेंद्रिय खत व बायोचार निर्मितीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. आयआयव्हीआरमध्ये विविध भाजीपाला पिकांच्या अधिक उत्पादनक्षम संकरित व सुधारित वाणांच्या बियाण्यांसह कृषी निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत चर्चा झाली. प्राप्त बियाण्यांची प्रथम महाबीज स्तरावर चाचणी करण्यात येणार असून, महाराष्ट्राच्या हवामानास अनुकूल ठरणारे वाणच निर्धारित प्रक्रियेनंतर विपणन साखळीत समाविष्ट केले जाणार आहेत.

जीर्ण इमारतीत ३११ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! छताची गळती, पोषण आहाराचा तुटवडा; लिपिकाचे पद २० वर्षांपासून रिक्त

अकोला येथे होणार प्रशिक्षण

दरम्यान, एनएसआरटीसीसोबत बियाणे परीक्षणातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा झाली. महाबीजच्या अधिकाऱ्यांना अकोला येथे प्रशिक्षण देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. या उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि अधिक उत्पादनक्षम वाणांचा पर्याय उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Agreements signed with national organizations for high quality seeds climate resilient and high yielding varieties will now be available

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • farmer
  • Seeds and Fertilizer
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Farmer Success Story : गरिबीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने… ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर करुन बदललं नशीब! आता कमवतोय लाखो रुपये
1

Farmer Success Story : गरिबीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने… ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर करुन बदललं नशीब! आता कमवतोय लाखो रुपये

कृषी क्षेत्रात नवा अध्याय! ग्रामीण महिला बनल्या उद्योजिका; Corteva च्या एका उपक्रमाने बदलले 6.37 लाखांहून अधिक महिलांचे आयुष्य
2

कृषी क्षेत्रात नवा अध्याय! ग्रामीण महिला बनल्या उद्योजिका; Corteva च्या एका उपक्रमाने बदलले 6.37 लाखांहून अधिक महिलांचे आयुष्य

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले
3

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले

Yavatmal News: धान कापणीला वेग; खरेदीला ब्रेक! व्यापाऱ्यांकडून कमी भावाची भीती; आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा
4

Yavatmal News: धान कापणीला वेग; खरेदीला ब्रेक! व्यापाऱ्यांकडून कमी भावाची भीती; आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.