Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला

Bail Pola Festival: अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पाणी आणि चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या बैलपोळा सणावर दिसत आहे. बैलांच्या सजावटीच्या साहित्याच्या खरेदीत यंदा सुमारे ७० टक्के घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 08, 2026 | 02:21 PM
चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला (फोटो सौजन्य- पोपट पिटेकर)

चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला (फोटो सौजन्य- पोपट पिटेकर)

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाचे सावट सर्जा-राजाच्या सणावर
  • बैलपोळ्याच्या खरेदीत ७० टक्के घट
  • बळीराजाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट
 

पोपट पिटेकर,​अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पाण्याची कमतरता आणि जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतीबरोबरच पशुधन जगवण्याचे आव्हान बळीराजासमोर उभे ठाकले आहे. या परिस्थितीचा परिणाम आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या बैलपोळा (Bail Pola Festival) सणावरही दिसू लागला आहे.

बैलपोळ्याच्या बाजारात शुकशुकाट

बैलपोळा अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाही बाजारपेठांमध्ये दरवर्षीसारखी गर्दी आणि उत्साह दिसत नाही. बैलांच्या शिंगांना रंगवण्यासाठी रंग, गोंडे, घुंगरमाळा, झूल, बाशिंग, मोरक्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंची दुकाने सजली आहेत. मात्र ग्राहकांची संख्या घटल्याने व्यापाऱ्यांना विक्रीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

साखरेचा दर १०० रुपये किलोवर जाणार? महागाईचा फटका की शेतकऱ्यांना मोठा फायदा

३-४ हजारांचा खर्च थेट ५०० रुपयांवर

गेल्या वर्षी बैलांच्या सजावटीसाठी ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत खर्च करणारे शेतकरी यंदा अवघ्या ५०० रुपयांपर्यंतच खरेदी करत असल्याचे चित्र आहे. आधीच शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याबाबत चिंता असताना जनावरांच्या चारा-पाण्यासाठी होणारा खर्च आणि वाढती महागाई यामुळे शेतकऱ्यांनी सणाचा खर्च कमी केला आहे.

खरेदीत तब्बल ७० टक्क्यांची घट

यंदा पोळ्याच्या साहित्याच्या खरेदीत सुमारे ७० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सण जवळ आला तरी अपेक्षित विक्री होत नसल्याने मोठ्या प्रमाणात सजावटीचे साहित्य दुकानांमध्ये पडून आहे. त्यामुळे दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता स्थानिक व्यापाऱ्यांनाही बसत आहे.

सर्जा-राजाचा सण यंदा साधेपणाने

बैलपोळ्याला शेतकरी वर्षभर शेतीत साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. बैलांना अंघोळ घालून, शिंगे रंगवून आणि आकर्षक सजावट करून त्यांची पूजा केली जाते. मात्र यंदाच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक शेतकरी उपलब्ध असलेल्या जुन्याच सजावटीच्या साहित्याचा वापर करून किंवा अत्यंत मोजकी खरेदी करून पोळा साजरा करण्याच्या तयारीत आहेत.

शेतकऱ्यांबरोबर व्यापारीही संकटात

पोळ्याच्या काळात होणारी उलाढाल स्थानिक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे खरेदीत झालेली मोठी घट त्यांच्यासाठीही आर्थिक धक्का ठरत आहे. लाखो रुपयांचे साहित्य विक्रीअभावी पडून असल्याने यंदाचा पोळा शेतकरी आणि व्यापारी अशा दोघांसाठीही आर्थिक चिंतेचा ठरत असल्याचे चित्र अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळत आहे.

‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

Web Title: Ahilyanagar drought impact on bail pola festival farmers shopping drops by 70 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Farmers
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड
1

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड

आगामी ऊस गाळप धोरणासाठी मंत्री समितीची ‘या’ तारखेला बैठक; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार निर्णय
2

आगामी ऊस गाळप धोरणासाठी मंत्री समितीची ‘या’ तारखेला बैठक; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार निर्णय

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी
3

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
4

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.