
Chandrapur News: कर्जमाफीचा निर्णय कधी? चंद्रपूरमध्ये 3.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत, सातबारा कोरा होणार का?
Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु, शेती हा व्यवसाय पूर्णता निसर्गाच्या भरवशावर विसंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी कोरड्या दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळाशी सामना करावा लागतो. यंदाच्या खरीप हंगामात तर प्रारंभी पासूनच जिल्ह्यात अत्यल्प राहिलेले पर्जन्यमान त्यातच खरीप पेरण्यांना झालेला विलंब दुबार पेरणीचे आलेले संकट आणि गत महिनाभरापासून दडी मारून बसलेला पाऊस या नैसर्गिक चक्रासह शेतकऱ्यांसाठी प्रमुख पीक ठरत असलेले सोयाबीन व कपाशी या पिकावर किडीचा वाढता प्रादुर्भाव, रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची दुबार तिबार फवारणी करून देखील किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे. त्यातच पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने उभे पीक सुकू लागले. शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध जलसाठ्यांवर तुषार सिंचनाद्वारे पीक जगविण्याची धडपड सुरू केली. एकीकडे पीक जगविण्याची धडपड तर दुसरीकडे किडीचा वाढता प्रादुर्भाव अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याची गरज भासत आहे.
वातावरणातील बदलामुळे सोयाबीन पिकांवर सार्वधिक किडींचा प्रादुर्भाव झाला असून, ऑगस्टपर्यंत साधारणतः ४ ते ५ फवारण्या झाल्या आहेत. एवढे होऊनही किटकांची अंडी मरू शकली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात पाऊस पडला नाही आणि त्यातही पिकांवर किडीचा वाढता मारा हा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरत आहे. शेतकऱ्यांसाठी कीटकनाशकांच्या किंमतीचे दर गगनाला भिडलेल्या आहेत. साधारणतः ३ ते ४ फवारण्याचा खर्च हा एकरी ४ हजार रुपये एवढा असून, शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्हह्यातील शेतक-यांनी ७लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी केली. त्यापैकी सोयाबीनचा ४ लाख ४८ हजार ७०४ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला, तर कपाशीचा पेरा १ लाख ३५ हजार २१४ हेक्टर क्षेत्रावर झाला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्य पीक ठरत असलेल्या या खरीप पिकांवर किडीच्या वाढत्या आक्रमणामुळे हे पीक धोक्यात आले.
शेतकरी डोंगरखडांळाचे शेतकरी, श्याम चव्हाण म्हणाले की, खरीप पेरण्यांना अगोदरच विलंब झाला त्यानंतर अधूनमधून आलेल्या सरीमुळे खरीप पीकही बहरले. परं, १ महिन्यापासून पावसाने उसंत घेतली. त्यातच सोयाबीन कपाशी पिकावर किडीचा वाढता प्रादुर्भाव, कीड नियंत्रणात आणण्यासाठी महागडी औषधाची फवारणी करून देखील किडी नियंत्रणात येत नसल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली.
बोरगाव काकडीचे शेतकरी, सिद्धेश्वर काकडे म्हणाले की, 66 सध्या खरीप पिक पपड़ी अवस्थेत असताना पावसाने घेतलेली उसंत त्यातच अळीचे वाढते आक्रमण म्हणजे आमच्यासाठी दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे.