Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: खरात प्रकरणात नगर जिल्ह्यातील प्रभावी नेत्याचा सहभाग? डॉ. सुजय विखे पाटलांचे संकेत

अशोक खरात प्रकरणावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी एक सूचक विधान केले आहे. खरात प्रकरणात एका प्रभावशाली राजकीय नेत्याच्या सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 22, 2026 | 08:21 PM
खरात प्रकरणात नगर जिल्ह्यातील प्रभावी नेत्याचा सहभाग? डॉ. सुजय विखे पाटलांचे संकेत

खरात प्रकरणात नगर जिल्ह्यातील प्रभावी नेत्याचा सहभाग? डॉ. सुजय विखे पाटलांचे संकेत

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरात प्रकरणावर सुजय विखे पाटलांचे वक्तव्य
  • जिल्ह्यातील एका प्रभावशाली राजकीय नेत्याच्या सहभाग?
  • वाचा संपूर्ण बातमी
खरात प्रकरणात नगर जिल्ह्यातील एका प्रभावशाली राजकीय नेत्याच्या सहभागाचे संकेत आहेत. प्रत्येक वादग्रस्त बाबीत हा नेता कसा सहभागी असतो ? या प्रकरणाच्या तपासातून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. अटक केलेला आरोपी कोणत्या राजकारण्यांचा एजंट होता, हे देखील समोर येईल, असे सांगत भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणातील गंभीरता स्पष्ट केली आहे.

अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. सध्या समोर येणाऱ्या माहितीमुळे प्रकरणाची गंभीरता वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, सत्य बाहेर येणे अत्यावश्यक आहे. समाजातील सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला आणि प्रवृत्तीला मुळीच सहन केले जाणार नाही. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळणे हीच आपली प्राथमिकता आहे. विशेषतः अन्याय झालेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी.

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख

शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सकडे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असून, तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाचा पोलिस तपास सध्या सुरू आहे. येत्या काळात अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. असे सांगून डॉ. विखे पाटील म्हणाले, काही व्हिडिओंमधून नगर जिल्ह्यातील एका प्रभावशाली राजकीय व्यक्तीच्या सहभागाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. तपास यंत्रणा आपले काम करत असून, कोणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होणारच आहे.

पाळेमुळे कितपत खोलवर रुजली ?

भोंदूबाबा खरात याच्यावर पहिला गुन्हा शिडर्डीत दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणाचा गोपनीय तपास शिर्डीतूनच करण्यात आला. याच तपासाच्या आधारावर आता नाशिक पोलिस तपास करत असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे. एकूणच शिर्डी कनेक्शन अत्यंत गंभीर असून, त्यात भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणाच्या गांभिर्यावर सातत्याने वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिर्डीसह नगर जिल्ह्यात या प्रकरणाची पाळेमुळे कितपत खोलवर रूजली आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चक्क Siddhivinayak मंदिरात चोरी! दानपेटीतून चोरले तब्बल ‘इतके’ रुपये; पोलिसांकडून तपास सुरु

प्रत्येक वादात तोच लोकप्रतिनिधी !

या प्रकरणात ज्या लोकप्रतिनिधीच्या सहभागाचे संकेत मिळत आहेत, तो लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील प्रत्येक वादात असतो. असे का घडते, असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. ही केवळ योगायोगाची बाब आहे का, की त्यामागे काही वेगळे वास्तव दडले आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे डॉ. विखे पाटील म्हणाले. आपण निवडून देत असलेले लोकप्रतिनिधी खरोखरच समाजाच्या हितासाठी काम करतात का, की ते फक्त वादांमध्येच दिसून येतात, हा प्रश्न नागरिकांनी स्वतःला विचारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

साईंची भूमी सर्वधर्म समभाव जपणारी

रमजान ईदच्या निमित्ताने डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. इदगाह मैदानावर उपस्थित राहून त्यांनी नागरिकाशी संवाद साधत एकोप्याचा आणि बंधुभावाचा संदेश दिला. शिर्डी ही सर्व धर्म समभाव जपणारी भूमी असल्याचे सांगत, साईबाबांच्या विचारातून समाजात एकता आणि सौहार्द वाढावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Ahilyanagar news ashok kharat case political leader involvement sujay vikhe patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ashok Kharat Case
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?
1

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
2

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
3

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
4

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.