Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: …तर रास्ता रोको आंदोलन करू! संगमनेरमधील मुख्याधिकाऱ्यांना थेट देण्यात आला इशारा

संगमनेरमध्ये नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी महायुतीच्यावतीने मागणी करण्यात आली. यावेळी मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको करू असा इशाराही मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 25, 2025 | 08:28 PM
...तर रास्ता रोको आंदोलन करू! संगमनेरमधील मुख्याधिकाऱ्यांना थेट देण्यात आला इशारा

...तर रास्ता रोको आंदोलन करू! संगमनेरमधील मुख्याधिकाऱ्यांना थेट देण्यात आला इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • संगमनेर शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु
  • नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी महायुतीच्यावतीचे निवेदन
  • मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
संगमनेर शहरात कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा, बंद अवस्थेतील पथदिवे तसेच ढिसाळ कचरा व्यवस्थापन या गंभीर समस्यांवर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महायुतीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना महायुतीच्या शैलीत तीव्र आंदोलनासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

संगमनेर नगरपालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात येऊन नवीन नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले असले, तरीही नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संगमनेर शहराला निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात असतानाही शहरातील सर्वच प्रभागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून होत आहेत.

नवीन वर्षात कार मालकांना अच्छे दिन? CNG चे भाव ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

त्याचप्रमाणे शहरातील बहुतांश भागांतील पथदिवे बंद अवस्थेत असून नियमित कचरा उचलला जात नसल्याने उपनगरांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिणामी नगरपरिषदेचे कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. या गंभीर समस्यांकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महायुतीने केला आहे.

संगमनेरला तातडीने नियमित पाणीपुरवठ्याची मागणी

या संदर्भात नागरिकांकडून वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने शहरात तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा देत सर्व प्रभागांमध्ये तत्काळ पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, बंद असलेले पथदिवे युद्धपातळीवर दुरुस्त करावेत तसेच शहरातील केरकचरा त्वरित उचलून शहर स्वच्छ ठेवावे, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.

Nissan च्या पाठोपाठ 2026 मध्ये ‘या’ कंपनीच्या कार देखील महाग होण्याची शक्यता

मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन

नगरपरिषद प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर शिवसेना महायुतीच्या शैलीत तीव्र आंदोलन तसेच लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Ahilyanagar news direct warning given to chief officer of sangamner by mahyuti for sangamner water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 08:28 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Sangamner
  • Water supply

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: बिबट्यांच्या हालचालींवर आता AI ची नजर! वनविभागातर्फे खास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
1

Ahilyanagar News: बिबट्यांच्या हालचालींवर आता AI ची नजर! वनविभागातर्फे खास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी
2

अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

Ahilyanagar News: आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
3

Ahilyanagar News: आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
4

नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.