Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा

उन्हाच्या झळांचा त्रास केवळ माणसांनाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही तितकाच सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या या तीव्र काहिलीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि थोडासा थंडावा मिळवण्यासाठी आता Ahilyanagar मधील भटक्या कुत्र्यांनी एक अनोखी शक्कल लढवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 17, 2026 | 11:36 AM
Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा
Follow Us
Follow Us:
  • तापमानाचा पारा कडाडला
  • कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा
  • झाडांची सावली अन् ओली माती ठरतेय आधार
अहिल्यानगर/पोपट पिटेकर : मार्च-एप्रिल महिना सुरू झाला की उन्हाचा कडाका बराच वाढू लागतो. दुपारच्या वेळी तर सूर्य आग ओकत असल्याचा भास होतो. या वाढत्या तापमानाचा आणि उन्हाच्या झळांचा त्रास केवळ माणसांनाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही तितकाच सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या या तीव्र काहिलीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि थोडासा थंडावा मिळवण्यासाठी आता शहरातील भटक्या कुत्र्यांनी एक अनोखी शक्कल लढवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

झाडांची सावली अन् ओली माती ठरतेय आधार

सध्या सोशल मीडियावर आणि गल्लीबोळात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे. दुपारच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी इमारतींच्या बाजूला असलेल्या झाडांच्या सावलीत, जेथे मातीमध्ये थोडा ओलावा किंवा थंडावा आहे, अशा जागा या श्वानांनी शोधून काढल्या आहेत. कोरड्या पडलेल्या जमिनीवर झाडांच्या छत्रछायेखाली ही कुत्री शांतपणे सुस्तावलेली आणि विश्रांती घेताना दिसत आहेत. माणसांप्रमाणेच त्यांनाही या दिवसांत थंड जागेची किती तीव्र गरज असते, हेच या दृश्यावरून अधोरेखित होते.

तहान भागवण्यासाठी पाण्याची बाटलीही सोबत!

विश्रांती घेतानाच उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या असते ती पिण्याच्या पाण्याची. यातीलच एका जागरूक श्वानाने तर आपल्या शेजारीच पाण्याची रिकामी बाटली ठेवून जणू ‘पाण्याची सोय करा’ असाच संदेश दिला आहे. प्राणीप्रेमींकडून उन्हाळ्याच्या दिवसांत या मुक्या प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

फटका रस्त्यावरील प्राण्यांना

ऋतू कोणताही असो, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या रस्त्यावरील प्राण्यांना बसत असतो. सध्या वाढत्या उन्हामुळे या मुक्या जिवांची अवस्था बिकट होते. त्यामुळे आपल्या घराबाहेर किंवा सोसायटीच्या आवारात प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवावीत. शक्य असल्यास त्यांना दुपारच्या वेळी सावलीत आश्रय घेऊ द्यावा, निसर्गाच्या या आव्हानाचा सामना करत, या चतुर श्वानांनी शोधलेला हा थंडगार निवारा सध्या येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

बुलढाण्याची राज्यात दमदार कामगिरी! मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेत विदर्भात प्रथम क्रमांक; ५५६ जणांना रोजगार

Web Title: Ahilyanagar news stray dogs find unique shelter to beat summer heat wave marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Dogs
  • heatwave
  • Marathi News
  • Street dogs

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.