Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: डासांमुळे कोपरगावकरांचे आरोग्य धोक्यात! उपाययोजनेची राष्ट्रवादीची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

कोपरगावात डासांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. तसेच, याबाबत लवकरात लवकर उपाययोजना व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीने मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहें.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 19, 2026 | 09:15 PM
डासांमुळे कोपरगावकरांचे आरोग्य धोक्यात! उपाययोजनेची राष्ट्रवादीची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

डासांमुळे कोपरगावकरांचे आरोग्य धोक्यात! उपाययोजनेची राष्ट्रवादीची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

Follow Us
Follow Us:

कोपरगाव शहर आणि नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक प्रभागांमध्ये अस्वच्छ व गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोपरगावकरांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.१६) रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने असे म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून कोपरगाव शहरात डासांची संख्या झपाट्याने वाढत असून सायंकाळच्या वेळी नागरिकांना डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला असून याचा विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरीकांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील अनेक प्रभागांमध्ये गाळमिश्रित व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात घातले जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, वाल्मिक लहिरे, शैलेश साबळे, इम्तियाज अत्तार, संदिप कपिले, अरुण त्रिभुवन, रमेश गवळी, फकीर कुरेशी, सचिन गवारे, वैभव कानडे, गणेश गोसावी, मनोज नरोडे, मनोज शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ahilyanagar News: अशा घटना घडतातच कशा? सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला! ग्रामस्थ संतापले, कठोर कारवाईची मागणी

उपाययोजना न केल्यास साथीचे रोग पसरतील

या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास शहरामध्ये टायफॉइड, कॉलरा, कावीळ व गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शहराची स्वच्छता, आरोग्य आणि शुद्ध पाणी ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र सध्या प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नगरपरिषदेकडे औषध फवारणीसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध असतानाही या यंत्रणेचा वापर केला जात नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी का केली जात नाही.

औषध फवारणीसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध

कोपरगावकरांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले. सध्या प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नगरपरिषदेकडे औषध फवारणीसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध असतानाही या यंत्रणेचा वापर केला जात नाही. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करून दोष दूर करावेत व नागरिकांना स्वच्छ, गाळविरहित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.

Raj Thackeray Live: “… सत्ता हातात घेणार म्हणजे घेणारच”; राज ठाकरेंचे मोठे विधान

कोपरगाव शहरातील नागरिकांना गाळविरहित पाणीपुरवठा करण्याची मागणी

पालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. नागरिकांकडून पाणीपट्टी व आरोग्य कर वसूल केला जात असताना मूलभूत सुविधा का दिल्या जात नाहीत? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला
आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करून दोष दूर करावेत व नागरिकांना स्वच्छ, गाळविरहित पाणीपुरवठा करावा, तसंच शहरातील सर्व प्रभागांमध्ये औषध फवारणी मोहीम राबवून डासांचा समूळ नायनाट करावा अशी
मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देऊन करण्यात आली.

Web Title: Ahilyanagar news mosquito menace kopargaon health risk ncp demands action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • kopargoan
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.