Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात रुग्णसेवा होणार आणखी सक्षम; नोव्हेंबरपासून एअर अ‍ॅम्ब्युलन्स येणार सेवेत

एअर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू केली जाणार असून, ही सुविधा महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस -१०८) अंतर्गत उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2025 | 08:49 AM
राज्यात नोव्हेंबरपासून एअर अ‍ॅम्ब्युलन्स

राज्यात नोव्हेंबरपासून एअर अ‍ॅम्ब्युलन्स

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. त्यात आता राज्यातील नागरिकांच्या आरोग्य आपत्कालीन वैद्यकीय सेवेत मोठी झेप ठरणारी एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा राज्य सरकार नोव्हेंबरपासून सुरू करणार आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

एअर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू केली जाणार असून, ही सुविधा महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस -१०८) अंतर्गत उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले. यासोबतच राज्यभर नव्या स्वरूपातील २०० अत्याधुनिक भूमीवरील रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये मोबाइल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस आणि कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही ट्रायएज सिस्टीमसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.

तसेच ग्राहक संबंध व्यवस्थापन, संगणकीकृत डिस्पॅच प्रणाली, वाहन ट्रॅकिंग आणि रुग्ण आगमनाची पूर्वमाहिती देणारी प्रणालीही बसवली जाईल. ही रुग्णवाहिका 5G तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यामध्ये व्हेंटिलेटरसह २५ हून अधिक वैद्यकीय उपकरणे असतील. नव्या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे अधिक सुलभ होईल, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

समुद्री बोटी रुग्णवाहिका सेवेत

आरोग्य विभागाला रुग्णवाहिका सेवेसंदर्भात येणाऱ्या तक्रारीचा विचार करून ही सेवा अधिक कार्यक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमित एसएसजी बीव्हीजी या संस्थेसोबत १० वर्षांचा करार करण्यात आला असून, पहिल्या टप्यात २०० रुग्णवाहिका रस्त्यावर धावणार असल्याचे सांगितले.

इतर अनेक माध्यमं सेवेत

एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या सेवेव्यतिरिक्त, समुद्री बोटी रुग्णवाहिका सेवेत समाविष्ट केल्या जाणार आहेत. ज्यामुळे किनारी स भागातील आपत्कालीन परिस्थितीतही तत्काळ मदत शकेल असे सांगण्यात आले.

हेदेखील वाचा : ‘I love Muhammad’ प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातही, सामाजिक समतेसाठी GEN Z उतरले रस्त्यावर

Web Title: Air ambulance in the state from november says minister prakash abitkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • Maharashtra Govenment
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: मध्यरात्री आरोग्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट; ढिलाई आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!
1

Chhatrapati Sambhajinagar: मध्यरात्री आरोग्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट; ढिलाई आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

कोल्हापुरातील सीपीआरमधील रक्त तपासणीचा पर्दाफाश; गरीब रुग्णांची होणारी लूट उघडकीस
2

कोल्हापुरातील सीपीआरमधील रक्त तपासणीचा पर्दाफाश; गरीब रुग्णांची होणारी लूट उघडकीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.