Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरा भाईंदर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली; महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे आले यश

मिरा भाईंदर शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली होती. त्यामुळे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुक्त संजय काटकर यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 14, 2023 | 07:53 AM
मिरा भाईंदर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली; महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे आले यश
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली होती. त्यामुळे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुक्त संजय काटकर यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) १३० वरून ७७ निर्देशांकावर आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

निर्देशांक सुधारल्यामुळे शहरातील हवा चांगली असल्याचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले. मिरा भाईंदर महापालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांनी महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने विभागप्रमुखांची आढावा बैठक घेऊन आवश्यक ते निर्देश दिले होते. हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्रभाग अधिकारी यांनी आरएमसी प्लांटला भेट देऊन स्थळ पाहणी करून नियमांचे उल्लंघन न होण्याबाबत प्लांट धारकांना नोटिसा दिल्या होत्या.

तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी व आरएमसी प्लांटधारकांनी मिस्ट स्प्रे यंत्रणा बसविणे, साईटवरून बाहेर येणाऱ्या गाड्यांचे टायर धुणारी यंत्रणा बसविणे, ग्रीन नेटचा वापर करणे व डेब्रिज वाहून नेणाऱ्या गाड्या या बंदिस्त राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई

घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दैनंदिन साफसफाई करताना धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी मेकॅनिकल स्विपिंग मशीनचा वापर करणे, उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करणे, डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यावर प्रक्रिया करताना हवा प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता घेणे. बंदिस्त गाडीतून कचऱ्याची वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रयत्नांमुळे मिरा भाईंदर शहराचा एक्यूआय १३० वरून ७७ वर येऊन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे.

Web Title: Air quality improved in mira bhayandar city the success came due to the efforts made by the municipal corporation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2023 | 07:53 AM

Topics:  

  • Air Pollution
  • Air quality
  • maharashtra
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.