नगरपालिका नगरपंचायतीसाठी जिल्ह्यात तब्बल २०३६ उमेदवारी अर्ज दाखल (फोटो-सोशल मीडिया)
कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपालिका तसेच तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०३६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी १६९ तर नगरसेवकपदासाठी १८६७ असे एकूण २०३६ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जाची छाननी सोमवारी करण्यात आली असून, आता कोण कोणाच्या प्रभागातून माघारी घेते याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, मलकापूर, पन्हाळा, पेठ वडगाव, मुरगुड, हुपरी, शिरोळ, आजरा, चंदगड, हातकणंगले आदींचा समावेश आहे. या सर्व नगरपालिका व नगरपंचायतीसाठी मोठ्याने आणि चुरशीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल झालेल्या मध्ये गडहिंग्लज नगरपालिकेत सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. गडहिंग्लजमध्ये सर्वाधिक २७ अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी पन्हाळा आणि मलकापूर नगरपरिषदेत आले आहेत. यामध्ये दोन्ही नगरपालिकेत सहा जणांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण
कुरुंदवाड पालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी १५, नगरसेवक पदासाठी १७३, शिरोळ नगराध्यक्षपदासाठी ९, नगरसेवकसाठी ११०, जयसिंगपूर नगराध्यक्षपदासाठी १२, नगरसेवक पदासाठी २०१, पेठ वडगाव नगराध्यक्षपदासाठी ९, नगरसेवक पदासाठी ७७, पन्हाळा नगराध्यक्षपदासाठी ६, नगरसेवक पदासाठी ८१, हातकणंगले नगराध्यक्षपदासाठी १३, नगरसेवक पदासाठी १५१, हुपरी नगराध्यक्षपदासाठी ८, नगरसेवकपदासाठी १०५, चंदगड नगराध्यक्षपदासाठी १६, नगरसेवक पदासाठी १२५.
मुरगोडमध्ये नगरसेवकपदासाठी २२३
मुरगोड नगराध्यक्ष पदासाठी १५, नगरसेवक पदासाठी २२३, आजरा नगराध्यक्षपदासाठी १८, नगरसेवक पदासाठी १३५, मलकापूर नगराध्यक्षपदासाठी ६, नगरसेवक पदासाठी ८४ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये कागल नगरपालिका निवडणुकीसाठी २३ जागांसाठी २२७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
हेदेखील वाचा : Nashik News : अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; नगराध्यक्षपदासाठी ६०, नगरसेवकपदासाठी ९८० अर्ज दाखल






