Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar plane crash : वैमानिकाचा अंदाज चुकला असावा…! अजित पवारांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये दोन कारणे समोर आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 06, 2026 | 11:55 AM
Ajit Pawar Plane Crash, V.K. Singh CID Probe, Pilot Sumit Kapoor,

Ajit Pawar Plane Crash, V.K. Singh CID Probe, Pilot Sumit Kapoor,

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांच्या विमानाचा अपघात
  • अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर
  • प्राथमिक अहवालातून दोन कारणं समोर
Ajit Pawar plane crash : बारामती : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा 28 जानेवारी रोजी अपघात झाला. मुंबहून बारामतीला जाताना लॅंडिगवेळी हा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी बारामतीमध्ये (Baramati News) येत होते. मात्र धावपट्टीच्या अगदी शेजारी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. यामुळे राजकीय वर्तुळातमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानातील इंधनामुळे तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे देखील वाचा : ‘…तर आंबेगाव तालुक्यात एमआयडीसी उभारणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

अपघातानंतर घटनास्थळाहून अजित पवार यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांच्या हातातील घड्याळामधून अजित पवारांच्या पार्थिवाची ओळख पटली. विमान अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. सीआयडीचीही स्थापना या प्रकरणात करण्यात आली. विमान अपघातानंतर लगेचच केंद्रिय पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संबंधित तपास केला. हेच नाही तर अपघातानंतर विमानाचे राहिलेले अवशेष देखील मुंबईला तपासासाठी आणण्यात आली.

प्राथमिक दोन कारणं आली समोर

बारामती विमान अपघातानंतर डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या प्राथमिक अहवालात मोठी माहिती पुढे आली. मीडिया रिपोर्टनुसार, या प्राथमिक अहवालामध्ये वैमानिकाचा अंदाज चुकला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. वैमानिकाचा अंदाज चुकला किंवा विमानात तांत्रिक बिघाड हे देखील कारण दिसत आहे. कारण धावपट्टीच्या अगदी जवळ हे विमान कोसळले. वैमानिकांचा अंदाज चुकल्याची मोठी शक्यता आहे. कारण ज्यादिवशी हा अपघात झाला, त्यादिवशी व्हिजिबिलीटी कमी असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. अजून याबाबत सखोल तपास केला जात आहे. हे प्राथमिक दोन कारणं असल्याचे अहवालात म्हटले.

हे देखील वाचा : पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप

बदलली राजकारणाची दिशा

अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलली आहे. अजित पवारांनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीचा एक गट सत्तेमध्ये कायम राहिला आहे. तर दुसरा गट हा विरोधामध्ये राहिला आहे. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हे पक्षाचे अध्यक्ष होण्याची शक्यता होती. मात्र अद्याप नाव समोर आलेले नाही.

Web Title: Ajit pawar plane crash preliminary report reveals 2 reasons for accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • baramati news

संबंधित बातम्या

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ
1

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी
2

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?
3

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला वेग; सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला शेळके यांचा पाठिंबा
4

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला वेग; सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला शेळके यांचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.