Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी

नगर परिषदेच्या मासिक सभेदरम्यान व्हिडिओ शूटिंग करण्याच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर या वादाचे पर्यवसान नगर परिषदेसमोरच हाणामारीत झाले. यात शिंदेसेनेचे नगरसेवक ऋषिकेश पंचबुद्धे यांच्यासह दोन्ही गटांतील जण जखमी झाल्याची माहिती आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 29, 2026 | 03:19 PM
अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी

अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी

Follow Us
Follow Us:

अकोला : महाराष्ट्रात तसेच केंद्र सरकारमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेत खांद्याला खांदा लावून काम करत असताना हिवरखेड नगरपरिषदेत मात्र वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. नगर परिषदेच्या मासिक सभेदरम्यान व्हिडिओ शूटिंग करण्याच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर या वादाचे पर्यवसान नगर परिषदेसमोरच हाणामारीत झाले. यात शिंदेसेनेचे नगरसेवक ऋषिकेश पंचबुद्धे यांच्यासह दोन्ही गटांतील जण जखमी झाल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार पोलिस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांच्या उपस्थितीत घडला. त्यामुळे पोलिसांनी हाणामारी रोखली नाही की, त्यांना ती रोखता आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणत्याही गटाकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती ठाणेदार सचिन पाटील यांनी दिली. या घटनेनंतर हिवरखेडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी पक्षांतील स्थानिक पातळीवरील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे.

सभेत निघाले धारदार शस्त्र

दुसरीकडे, भाजपचे बांधकाम सभापती अजित जमीर खान यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच नगराध्यक्ष सुलभा दुतोंडे यांचे भाचे विशाल कुलट यांचा हात फॅक्चर झाला असून, त्यांच्या डोक्यावर व पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती आहे.

Rahul Gandhi PC Live : हल्दवानीत खर्गेंच्या रॅलीनंतर शुद्धीकरण; राहुल गांधींकडून भाजप-आरएसएसच्या मानसिकतेवर थेट हल्ला

नगर परिषद परिसरातील या प्रकारामुळे नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत असून, लोकप्रतिनिधींकडून संयम राखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशा घटनांमुळे नगर परिषदेच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शूटिंग सुरु ठेवल्याने वाद

सभेची अध्यक्ष म्हणून माझी परवानगी न घेता ऋषिकेश पंचबुद्धे यांनी व्हिडिओ शूटिंग सुरू केली. मनाई करूनही त्यांनी शूटिंग सुरूच ठेवल्याने वाद झाला. काही वेळाने सभा पूर्ववत सुरू झाली. नगर परिषदेसमोर झालेल्या हाणामारीबाबत मला कोणतीही माहिती नाही. या घटनेबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच योग्य ती भूमिका स्पष्ट करता येईल.

– सुलभा दुतोंडे, नगराध्यक्ष, नगर परिषद, हिवरखेड.

हिवरखेड नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता असून, दादागिरीच्या जोरावर जनतेचा व विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. विकासाचे प्रश्न उपस्थित केल्याने शिंदेसेनेचे नगरसेवक ऋषिकेश पंचबुद्धे यांना रॉडने मारहाण करण्यात आली. यात ते व मी जखमी झालो.

– रवी घुंगड, शिंदेसेना गटनेते तथा नगरसेवक

Web Title: Clashes at monthly meeting of hiwarkhed municipal council in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • akola news
  • political news

संबंधित बातम्या

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; नदी-नाले कोरडे, खरीप हंगाम धोक्यात
1

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; नदी-नाले कोरडे, खरीप हंगाम धोक्यात

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द
2

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द

पश्चिम विदर्भाच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर; नियोजन मंडळ स्थापनेची मागणी
3

पश्चिम विदर्भाच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर; नियोजन मंडळ स्थापनेची मागणी

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
4

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.