Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; नदी-नाले कोरडे, खरीप हंगाम धोक्यात

आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास नदी-नाल्यांना प्रवाह येऊन जलसाठ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्यास त्याचे परिणाम पुढील काही महिन्यांत अधिक प्रकर्षाने जाणवण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 28, 2026 | 01:11 PM
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; नदी-नाले कोरडे, खरीप हंगाम धोक्यात

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; नदी-नाले कोरडे, खरीप हंगाम धोक्यात

Follow Us
Follow Us:

मूर्तिजापूर : पावसाळा अर्ध्यावर येऊन ठेपला असतानाही तालुक्यातील अनेक नदी-नाले अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी चिंतेत असून, आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास त्याचा थेट परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर तसेच पुढील रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या पावसाळ्यात काही भागात पावसाच्या सरी झाल्या असल्या तरी पावसात सातत्य नसल्याने नदी-नाल्यांना अपेक्षित प्रवाह आलेला नाही. परिणामी, भूजलपातळी वाढण्यासही मर्यादा येत असून विहिरी, बोअरवेल तसेच अन्य जलस्रोतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात यापूर्वीही कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाच्या वितरणातील असमानता हा यंदाच्या हंगामातील चिंतेचा विषय ठरत आहे.

उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती

सध्या अनेक नदी-नाले कोरडे असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच जलस्रोतांची स्थिती, भूजलपातळी आणि गावनिहाय पाणी उपलब्धतेचा आढावा घेऊन संभाव्य पाणीटंचाईवर आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.

उत्पादनावर परिणामाची शक्यता

खरीप पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असताना पावसात पडणारा खंड शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा टिकून राहिला नाही तर पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे उत्पादन समाधानकारक राहील की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.

आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास नदी-नाल्यांना प्रवाह येऊन जलसाठ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्यास त्याचे परिणाम पुढील काही महिन्यांत अधिक प्रकर्षाने जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याचे उर्वरित दिवस तालुक्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून, वरुणराजाची दमदार हजेरी लागून नदी-नाल्यांना प्रवाह येतो का, याकडे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

भूजलसाठ्यावरही परिणामाची शक्यता

पावसाचे पाणी जमिनीत पुरेशा प्रमाणात मुरले नाही तर भविष्यात भूजलसाठ्धावरही परिणाम होऊ शकतो, पावसाळ्यानंतर नदी-नाल्यांमधील प्रवाह टिकून राहण्यासाठी भूजलाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे उर्वरित कालावधीत दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Sugar Black Marketing : साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु

Web Title: Farmers worries increase due to lack of rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • akola news
  • Climate Change
  • Heavy Rain
  • Rain News

संबंधित बातम्या

अकोलेकरांनो, पाणी जरा जपून वापरा; महान धरणातील जलसाठा घटतोय
1

अकोलेकरांनो, पाणी जरा जपून वापरा; महान धरणातील जलसाठा घटतोय

Weather Update : दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट
2

Weather Update : दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट

Climate Change: 2026 हे ठरणार इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष; शास्त्रज्ञ म्हटले जगासमोर उभं ठाकलं ‘हे’ सर्वात मोठं हवामान संकट
3

Climate Change: 2026 हे ठरणार इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष; शास्त्रज्ञ म्हटले जगासमोर उभं ठाकलं ‘हे’ सर्वात मोठं हवामान संकट

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
4

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.