Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 4408 हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान

जिल्ह्यातील अकोट, पातूर आणि मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील ३२ गावांमधील ४ हजार ४०८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच तेल्हारा तालुक्यात ५ हेक्टरवरील पीक बाधित झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2026 | 01:37 PM
मूर्तिजापूर तालुक्याला सर्वाधिक फटका,

मूर्तिजापूर तालुक्याला सर्वाधिक फटका,

Follow Us
Follow Us:

अकोला : जिल्ह्यात ३० आणि ३१ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे जवळपास ४ हजार ४०८ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, अकोट तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच २४ घरांची पडझड झाली. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मूर्तिजापूर तालुक्यात झाले. विशेष म्हणजे माना या एकाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. याविषयीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विभागीय कृषी सहसंचालकांकडे सादर केला. मात्र, प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचे वास्तव समोर येणार आहे.

39 गावात अतिवृष्टीमुळे पिके झाली बाधित

या अहवालानुसार, जिल्ह्यातील अकोट, पातूर आणि मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील ३२ गावांमधील ४ हजार ४०८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच तेल्हारा तालुक्यात ५ हेक्टरवरील पीक बाधित झाले. जिल्ह्यात ३० व ३१ जुलैपर्यंत सतत दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, अकोला व बार्शिटाकळी या सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदी व नाल्यांच्या काठासह जिल्ह्यातील विविध भागांत शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने पिके पाण्याखाली बुडाली. विविध भागांत सोयाबीन, कपाशी, तूर आदी खरीप पिकांचे गोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे जिल्ह्यातील पीक नुकसानीचा प्राथगिक अहवाल विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला.

असे झाले नुकसान…

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३९ गावे बाधित झाली. त्यात अकोट १०, तेल्हारा १, पातूर ९, अकोला १ व मूर्तिजापूर तालुक्यात १८ घरांचे नुकसान झाले. ते अकोट तालुक्यात एक व्यक्ती मृत्युमुखी पडला तर जिल्ह्यात २४ घरांची पडझड झाली. तसेच शेती पिकांचे सर्वाधिक नुकसान मूर्तिजापूर तालुक्यात ४ हजार २४१ हेक्टर, अकोट ९५ हेक्टर तर पातूर तालुक्यात ६७हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे.

पंचनाम्यानंतरच नुकसानीचे वास्तव येणार समोर

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ तीन तालुक्यात पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी, सहा तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याच्या पृष्ठभूमीवर पीक नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतरच वास्तव समोर येणार आहे. एकट्या मूर्तिजापूर तालुक्यात ४ हजार २४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये कापूस, सोयाबीन व तूर या पिकांचा समावेश आहे.

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा

Web Title: Kharif crops on 4408 hectares damaged in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • akola news
  • kharif crops

संबंधित बातम्या

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा
1

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा

Buldhana News: ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ, प्रवाशांना मिळणार आधुनिक व सुरक्षित प्रवास
2

Buldhana News: ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ, प्रवाशांना मिळणार आधुनिक व सुरक्षित प्रवास

ब्रिटिशकालीन अकोट फाईल रेल्वे पूल झाला जीर्ण; आता लवकरच अत्याधुनिक नवीन पूल उभारणार
3

ब्रिटिशकालीन अकोट फाईल रेल्वे पूल झाला जीर्ण; आता लवकरच अत्याधुनिक नवीन पूल उभारणार

अनियमित पावसाने बिघडले शेतीचे गणित; खरिपाची पेरणी लांबली, कपाशी, सोयाबीनवर…
4

अनियमित पावसाने बिघडले शेतीचे गणित; खरिपाची पेरणी लांबली, कपाशी, सोयाबीनवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.