
अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके
अकोला : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोल्याचे तापमान 47 अंशाच्यावर गेले होते. पण, अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने मे महिन्यात हा पारा ४० ते ४२ अंशाच्या आसपास राहत होते. आता त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.
सोमवारी अकोल्याच्या तापमानाची ४५.०१ सेल्सिअस इतकी नोंद झाली. ही वाढ राज्यात सर्वाधिक म्हणून नोंद करण्यात आली आहे. कायम राखत मंगळवारी तापमान ४५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, ते राज्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यात दिवसभर जिल्हावासियांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागला. या वाढत्या तापमानाने लहान मुले व वयोवृद्ध नागरिक कासावीस होत होते. विशेष म्हणजे संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊनही तापमानाचा पारा किंचितही कमी झाला नव्हता.
पुण्याच्या तापमानात मोठी वाढ; तापमानाचा पारा 38 अंशांवर, ढगांची चाहूल तरीही उकडा कायम
राज्यात मे महिन्यात हवामानात मोठा बदल जाणवत आहे. उष्णतेच्या लाटेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. सोमवारी देखील कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला होता.
तीन दिवस उष्णतेची लाट
नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे १२ ते १६ मे दरम्यान अकोला, तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार, आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे.
तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त
उष्मालाट असल्याने दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.