पुणे : नेते शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुणे शहरातील कार्यकर्ते भावुक झाले हाेते. शहर कार्यकारणीचा राजीनामा देण्यास पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. शहरातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी आणि दाेन्ही आमदार हे मुंबई येथे गेलेे आहेत.
दुपारी एकच्या सुमारास शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले. यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. प्रत्येक पदाधिकाऱ्याचे माेेबाईल फाेन खणाणू लागले. अनेकांना भावना अनावर हाेऊ लागल्या हाेत्या. पवार साहेबांनी राजीनामा परत घ्यावा अशी मागणी जाेर धरु लागली. दुपारनंतर पक्षाच्या डेंगळे पुलाजवळील कार्यालयासमाेर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते जमु लागले. शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस, महीला राष्ट्रवादी काॅंग्रेस, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस आणि पक्षाच्या इतर आघाडी, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी झाली हाेती. त्यांनी ‘मागे घ्या मागे घ्या राजीनामा मागे घ्या’, ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’, ‘शरद पवार झिंदाबाद’ , ‘देश का नेता कैसा हाे शरद पवार जैसा हाे’ अशा घाेेषणा देऊन परीसर दणाणून साेडला हाेता. कार्यकर्त्यांनी हातात शरद पवार यांचे छायाचित्र हातात घेऊन राजीनामा मागे घेण्याची मागणी करताना, अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या हाेत्या, काहींनी अश्रूंना वाट माेकळी करून दिली. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, गणेश नलावडे, अनिरुद्ध पासलकर, काका चव्हाण, निलेश वढे, राेहन पायगुडे आदी उपस्थित हाेते.
मुंबई येथे हाेणाऱ्या पुस्तक प्रकाशन साेहळ्यास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे आदी पदाधिकारी गेले हाेते. त्यांच्यािशवाय शहरात उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यालयात जमले हाेते.