सौजन्य - सोशल मिडीया
गडहिंग्लज/प्रा. सुनील देसाई : गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज क वर्ग नगरपालिका, आजरा व चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगरपालिका निवडणूकीची रणधुमाळी महिनाभर रंगणार असून इच्छुक सक्रिय झाले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या पक्षश्रेष्ठीकडे भेटीगाठी वाढल्या आहेत. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी फिल्डींग लावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढतीत इच्छुक उमेदवार आपले नशीब अजमिवणार आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवकासाठी इच्छूक उमेदवारांनीही सोशल मिडीयाचा आधार घेतला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ प्रयत्नशील?
गतवेळी जनता दलाच्या हाती गडहिंग्लज नगरपालिकेची सत्ता होती. अटीतटीच्या व चुरशीच्या लढतीत प्रा. स्वाती शिंदे कोरी थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ जनता दलाला रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जनता दल जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्याशी आघाडी करण्याच्या तयारीत आहे.
जनता दलाची जनसुराज्यला साद
नगराध्यक्षपद अनुसूचित जाती साठी राखीव आहे. राष्ट्रवादी विरोधात जनता दल १० व जनसुराज्य शक्ती पक्ष ८ तर भाजपा ४ तर अन्य घटक पक्ष २ जागा अशी आघाडी बहुचर्चित आहे. नगराध्यक्ष पद जनसुराज्य शक्ती पक्षाला देवून राष्ट्रवादीला रोखायचे आहे. सत्तेचा पट जनता दलाकडे ठेवायचा, अशी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
प्रभाग रचना अशी आहे.
प्रभाग १ (२ सदस्य)
साई कॉलनी, माने नगर, हाळलक्ष्मी नगर, केडीसीसी कॉलनी, साधना कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर, धबधबा मार्ग, माळगी वसाहत, सोलापूरे वसाहत, मदिना नगर, मेटाचा मार्ग. (मतदार संख्या: २९६१) अ – अनुसूचित जाती महिला ब – सर्वसाधारण
प्रभाग २ (२ सदस्य)
कंपोष्ट डेपो, मार्केट यार्ड, एस.टी. कॉलनी, सिद्राम पाटील कॉलनी, पिराजी पेठ, पोतदार लेआउट, मांडेकर गल्ली, बिलावर वसाहत, मकानदार वाडा. (मतदार संख्या: २९८३) अ – ना. मा. प्रवर्ग, ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग ३ (२ सदस्य)
लाखेनगर, बेळगुद्री वसाहत, गडहिंग्लज हायस्कूल, राजर्षीनगर, मांगलेवाडी, कदमवाडी,एम. आर. हायस्कूल, नवीन कोर्ट इमारत.(मतदार संख्या : २८७०) अ – ना. मा. प्रवर्ग महिला, ब – सर्वसाधारण
प्रभाग ४ (२ सदस्य)
विद्यानगर, शिवराज कॉलेज, गुजर वसाहत, एमएसईबी कॉलनी, खणगावे नगर, नदाफ कॉलनी, काजू बाग (कडगाव रोड बाजू) (मतदार संख्या : २८३४) अ – सर्वसाधारण महिला ब – सर्वसाधारण
प्रभाग ५ (२ सदस्य)
साधना हायस्कूल पाठीमागील अडसुळे गल्ली, सरस्वतीनगर, ओंकार कॉलेज परिसर, पोलिस लाईन कॉटर्स, पॅव्हेलियन इमारत, एकता नगर, गणेश मंदिर, गणेश मंगल कार्यालय,(मतदार संख्या: ३२२०) अ – सर्वसाधारण महिल, ाब – सर्वसाधारण
प्रभाग ६ (२ सदस्य)
जुने मटण मार्केट, आझाद रोड, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, गुणे गल्ली, मोहिते कॉम्लेक्स, भगतसिंग रोड, मोहितेनगर (चर्च रोड).(मतदार संख्या: २९२२) अ – सर्वसाधारण महिला ब – सर्वसाधारण
प्रभाग ७ (२ सदस्य)
साधना बुक स्टॉल, हावळ बिल्डींग कॉलनी, राणी लक्ष्मीबाई रोड, मुसळे बिल्डींग, लोकमान्य टिळक पथ, न. पा. कार्यालय, नाईक गल्ली, महालक्ष्मी मंदिर, सुभाष चित्र मंदिर परिसर, भगवान महावीर वसाहत, नेहरु चौक, घुगरे गल्ली. (मतदार संख्या: ३२२२) अ – ना. मा. प्रवर्ग महिला ब – सर्वसाधारण
प्रभाग ८ (२ सदस्य)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन परिसर, म. दु. श्रेष्ठी विद्यालय, दत्तप्रसाद मेडिकल परिसर, भीमनगर, हुजरे गल्ली, काळू मास्तर विद्यालय परिसर, दुंडगा मार्ग.(मतदार संख्या: २७३३) अ – अनुसूचित जातीब -सर्वसाधारण महिला
प्रभाग ९ (२ सदस्य)
श्री काळभैरी मंदिर परिसर, ताशिलदार गल्ली, तराळ गल्ली, मेवेकर गल्ली, नदीवेस परिसर. (मतदार संख्या: २८१०) अ- ना. मा. प्रवर्ग महिला ब – सर्वसाधारण
प्रभाग १० (२ सदस्य)
डॉक्टर कॉलनी, मगदूम कॉलनी, माणिकबाग, राजगुरुनगर परिसर, एस.टी. स्टेंड परिसर, लोकमान्य टिळक उद्यान परिसर.(मतदार संख्या: २८१६)अ- ना. मा. प्रवर्ग, ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग ११ (२ सदस्य)
गांधीनगर, अर्बन कॉलनी, कोड कॉलनी, अयोध्यानगर, घाळी कॉलनी, संकल्पनगर, देवगोंडा कॉलनी.
(मतदार संख्या : ३२५१) अ) ना. मा. प्रवर्ग, ब – सर्वसाधारण महिला
हे सुद्धा वाचा : तासगावात भाजप स्वबळावर मैदानात उतरण्यासाठी सज्ज; संजय पाटील गटाला आव्हान






