नालेसफाई अपूर्णच; मद्यपींना जुंपले? पालिकेच्या एस विभागातील काही ठिकाणी दारुड्यांच्या भरवशावर
यंदा मुंबई महानगरपालिका हद्दीतील नालेसफाई ११० टक्क्यांहून अधिक झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवरील परिस्थितीत पालिकेचे हे दावे किती पोकळ आहेत, याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईच्या एस विभागात नालेसफाईची १० जूनची अधिकृत डेडलाईन उलटून गेल्यानंतरही नाल्यांची दुरवस्था कायम आहे.(फोटो सौजन्य – AI)
धक्कादायक बाब म्हणजे, या विभागांमध्ये काही स्थानिक दारुड्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या माध्यमातून नालेसफाईचे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे केवळ बिले लाटण्यासाठीच कंत्राटदाराने हा ‘जुगाड’ केला आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. विक्रोळी आणि कांजूरमार्ग येथील काही नाले अद्यापही प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि गाळाने पूर्णपणे चोक-अप झाले आहे. यापैकी काही नाले साफ करण्यासाठी पिवळ्या पोकलेनसह नाल्यामध्ये स्थानिक व्यक्तीला कोणत्याही सुरक्षेविना थेट कचऱ्याच्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या ढिगाऱ्यात उतरवले जात आहे. कामगारांना सुरक्षा देणे बंधनकारक असताना, केवळ कामाचे बिल लाटण्यासाठी कंत्राटदाराने स्थानिक दारुड्यांना नाल्यात उतरवून हा जीवघेणा जुगाड केला आहे.
संपूर्ण उन्हाळा निघून गेला, पण इथे नालेसफाई करण्यासाठी पालिका किवा कंत्राटदाराचे कोणीही आले नाही. आता पाऊस अगदी तोंडावर आला आहे तोच यांनी घाईघाईने नालेसफाईचे काम करायला सुरुवात केली आहे.सर्वात गभीर बाब म्हणजे, या अत्यंत महत्त्वाच्या कामादरम्यान घटनास्थळावर पालिकेचा एकही अधिकृत कर्मचारी प्रत्यक्षात उपस्थित नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक मेहबूब यांनी दिली. दुसरीकडे, घटनास्थळी नालेसफाईचे काम करून घेणाऱ्या एका व्यक्तीने आपण ‘पालिकेचे कर्मचारी’ असल्याचा दावा केला.
एकीकडे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी ११० टक्के काम झाल्याचे कागदी घोडे नाचवत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून, कोणतीही यंत्रणा नसताना कंत्राटदार दारुड्यांच्या मदतीने नालेसफाईची मलमपट्टी करत आहेत. कंत्राटदारांचे खिसे भरण्याच्या या ‘जुगाडामुळे’ यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना पुन्हा एकदा तुंबलेल्या मुंबईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिसरातील प्रतिक्रिया तरुणी आईशा झा या तरुणीने दिली.
66 माझ्या विभागाल फायद्यासाठी ८० ते ८५ टक्के नालेसफाई झाली आहे. मात्र, कंत्राटदार आपल्या स्थानिक दारुड्यांचा वापर करून त्यांना नाल्यात उतरवत असल्याची मला अजिबात कल्पना नाही, असे राजेश सोनवलकर म्हणाले.






