Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : 102 टक्के पाऊस; तरीही ‘या’ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; वाढते तापमान आणि घटते भूजल

अमरावती जिल्ह्यात १०२ टक्के पाऊस झाला तरीही पाणीटंचाईचे संकट निर्माण झाली. जलसाठ्याचे योग्य नियोजन न झाल्याने आणि भूजल पातळी घटल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे मानले जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 06, 2026 | 02:07 PM
102 टक्के पाऊस; तरीही 'या' जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट

102 टक्के पाऊस; तरीही 'या' जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट

Follow Us
Close
Follow Us:

Amravati News Marathi : अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे सुमारे १०२ टक्के पर्जन्यमान झाले. मात्र वाढते तापमान, भूजल पातळीत होत असलेली घसरण आणि विहिरी-हातपंप आटण्याच्या स्थितीमुळे यंदाच्या उन्हाळ्यात ५४५ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सुमारे १९ कोटी रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार करून विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील १४ पैकी १० तालुक्यात सरासरीइतका तर उर्वरित ४ तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जवळपास एकूण १०२ टक्के पर्जन्यमान झाले आहे.

पीककर्ज दरात १२ टक्के वाढ! कर्जमाफीमुळे प्रति हेक्टर पीककर्जाची मर्यादा निश्चित; लक्ष्य मात्र अनिश्चित

असे असतानाही यंदाच्या उन्हाळयात ५४५ संभाव्य पाणीटंचाईची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील ५६ प्रकल्पात ५१.९४ टक्के जलसाठा आहे. यामध्ये अपर वर्धामध्ये ५३.३५ मध्यम प्रकल्पात ४८.५१ आणि लघुप्रकल्पांत ४२.३५ इतका जलसाठा आजघडीला उपलब्ध असला तरी भूजल पातळीत घसरण, विहीर व हातपंप आटण्याची स्थिती आणि वाढते तापमान यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येवर मात्र करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २०२६ च्या उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ सुमारे १९ कोटी ०७लाख ५७ हजार रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ७२२ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. प्राथमिक सर्वेक्षणानुसार प्रामुख्याने मेळघाट व पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये नळदुरुस्ती १४३ गावात विहीर अधिग्रहण अशा प्रकारच्या विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.

५४५ गावात पाणीटंचाईचा अंदाज घेऊन १९ कोटींचा आराखडा

जिल्ह्यात अपर वर्धा प्रकल्पात आजघडीला ७३.३४ टक्के, तर मध्यम प्रकल्पात ४८.५१ टक्के आणि लघुप्रकल्पांत ७२.३५ टक्के जलसाठा आहे. यंदा पाणीपुरवठा विभागाने उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या आराखड्‌यात ५४५ गावांत पाणीटंचाईचा अंदाज घेऊन आराखडा व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यंदा पाणीटंचाई निवारणार्थ सुमारे १९ कोटी ७लाख ५५ हजार रुपयांचा आराखडा तयार केलेला आहे. यामध्ये विविध प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत.

संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणीटंचाई निवारणार्थ १४३ खाजगी विहिरी अधिग्रहण व १५ टँकरचे नियोजन केले आहे. एका गावात टैंकर तर दोन गावांत विहीर अधिग्रहण जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याची झळ फारशी जाणवत नसली तरी पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या चिखलदरा तालुक्यातील मोथा येथे ३ टँकरने तर मोर्शी तालुक्यातील २ गावात खाजगी विहीर अधिग्रहण करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या शासन निर्णयानुसार टंचाई आराखडयात संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ विविध प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत.

जिल्हा परिषदेने पाठविलेल्या टंचाई आराखड्याला जिल्हाधिका-यांकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार टप्याटप्याने टंचाईची कामे करण्यात येणार आहेत. सध्या एका गावात टँकरने तर दोन गावांत खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता
पाणीपुरवठा विभाग स्नेहा धावडे यांनी दिली.

जलसाठ्यात झपाट्याने घट

वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांच्या पातळीत झपाट्‌याने घट होत आहे. काही प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणी उपलब्ध असले तरी शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करण्याच्च्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने उपाययोजना होत आहेत.

अशा आहेत प्रस्तावित उपाययोजनांची संख्या

नळयोजना विशेष दुरुस्ती – २८६
नवीन विधन विहीर – 97
तात्पुरती पूरक नळयोजना – 04
सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण – 51
खासगी विहीर अधिग्रहण – १४३
स्त्रोत बळकटीकरण उपाययोजना – १२६
टँकरने पाणीपुरवठा करणे – 15

अमरावतीकरांचे २.१७ लाखांचे दरडोई उत्पन्न! मात्र महागाईसमोर हतबल; उद्योगअभावी अर्थव्यवस्था ठप्प

Web Title: Amravati receives 102 percent rainfall yet faces looming water scarcity crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • amravati
  • maharashtra
  • Water Crisis

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली तारीख
1

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली तारीख

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा, जाणून घ्या काय म्हणाले
2

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा, जाणून घ्या काय म्हणाले

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी
3

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

पुण्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे आवाहन
4

पुण्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.