Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : पूर्णा नदी पात्रात पोकलेनचा ‘धुमाकूळ’, प्रशासनावर प्रश्नचिन्ह; रेतीचा बेकायदेशीर उपसा सुरुच

दर्यापूर, मूर्तिजापूर आणि अकोला तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात रेती उपसा केला जातो. आता रेतीचा उपसा वाढला असून आता पोकलेन व इतर जड मशिनरीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा केला जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 08, 2026 | 06:01 PM
( फोटो सौजन्य : AI )

( फोटो सौजन्य : AI )

Follow Us
Follow Us:
  • पोकलेन इतर जड मशिनरीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा
  • नदीचा नैसर्गिक समतोल बिघडण्याची भीती
  • प्रत्यक्षात मात्र वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू
Amravati News : दर्यापूर, मूर्तिजापूर आणि अकोला तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात रेती उपसा केला जातो. आता रेतीचा उपसा वाढला असून आता पोकलेन व इतर जड मशिनरीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमांनुसार नदीपात्रातून रेती उप सा करण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर करण्यास बंदी आहे. असं असतानाही काही रेती माफिया खुलेआम पोकलेन व इतर जड मशिनरीच्या मदतीने रेती काढत असल्याचे दिसून येत आहे.

Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

नदीचा नैसर्गिक समतोल बिघडण्याची भीती

दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या या धाडसी रेती चोरीमुळे नदीचा नैसर्गिक समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या रेती उपशामुळे परिसरातील भूजल पातळी झपाट्याने खाली जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोकलेनच्या वापरावर बंदी असतानाही रेती उपसा नदीपात्रातून रेती उपसा करताना पोकलेन व इतर जड मशिनरीचा वापर करण्यास शासनाने बंदी घातली आहे. तरीदेखील काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे पोकलेनच्या सहाय्याने रेती काढली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून महसूल विभाग व पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी वारंवार होत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्रीसह दिवसा देखील
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. त्यात ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीची वाहतूक केली जात आहे. या प्रकारामुळे नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणीय समतोल धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाची भूमिका संशयास्पद

महसूल प्रशासन व संबंधित विभागाच्या नाक्यावर तपासणी सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. दरम्यान, गेल्या सलग २ वर्षांपासून रेती घाटांचे लिलाव रखडले होते. यावर्षी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेती व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांच्या बोली लावून घाटांचे कंत्राट घेतले. मात्र कंत्राट मिळताच काही ठिकाणी खनिकर्म विभागाच्या नियमावलीला पायदळी तुडवत पोकलॅण्ड मशीनच्या साहाय्याने सीमांकन क्षेत्राबाहेर तसेच सीमांकन क्षेत्रातही खोलवर उत्खनन सुरू केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत स्थानिकांमध्ये बरीच नाराजी व्यक्त केली जात आहे.

आठ गावांची ‘जीवनरेषा’ धूसर! कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

Web Title: Purna river illegal sand mining pokland excavation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati City

संबंधित बातम्या

अमरावतीमध्ये एनएसयुआयचा पेपरफुटी निषेधार्थ मशाल मोर्चा, मोदी सरकारने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला – यशोमती ठाकूर
1

अमरावतीमध्ये एनएसयुआयचा पेपरफुटी निषेधार्थ मशाल मोर्चा, मोदी सरकारने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला – यशोमती ठाकूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.