Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashomati Thakur : हनुमान गढीच्या ‘कमर्शियल’ जागेसाठी १२१ कोटींची खिरापत का? यशोमती ठाकूर यांचा थेट सवाल

"ज्या ठिकाणी प्लॉटिंग सुरू आहे आणि जी जागा पूर्णतः व्यावसायिक आहे, तिथे सरकारी पैशांची उधळपट्टी का?" असा सवाल कॉंग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 16, 2026 | 06:30 PM
हनुमान गढीच्या 'कमर्शियल' जागेसाठी १२१ कोटींची खिरापत का? यशोमती ठाकूर यांचा थेट सवाल

हनुमान गढीच्या 'कमर्शियल' जागेसाठी १२१ कोटींची खिरापत का? यशोमती ठाकूर यांचा थेट सवाल

Follow Us
Follow Us:
  • हनुमान गढीच्या ‘कमर्शियल’ जागेसाठी १२१ कोटींची खिरापत का?
  • यशोमती ठाकूर यांचा थेट सवाल
  • देवेंद्र फडणवीसांच्या ‘पार्टनरशिप’वर संशय व्यक्त करत जोरदार हल्लाबोल
अमरावती, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेली शेकडो देवस्थाने निधीच्या प्रतीक्षेत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘हनुमान गढी’साठी १२१ कोटी रुपये मंजूर सरकारने मंजूर केला आहे. “ज्या ठिकाणी प्लॉटिंग सुरू आहे आणि जी जागा पूर्णतः व्यावसायिक आहे, तिथे सरकारी पैशांची उधळपट्टी का?” असा सवाल कॉंग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. या विकास कामाच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही ‘पार्टनरशिप’ आहे का, असा आरोपही त्यांनी केला आहे.

अमरावती जिल्ह्यात जहागीरपूरचे पौराणिक हनुमान मंदिर, कौंडण्यपूरचे देवस्थान, अष्टमासिद्धी आणि दर्यापूर येथील प्राचीन मंदिरे असताना त्यांना निधी का दिला जात नाही? “हनुमानजींच्या नावाने पैसे दिले हे ठीक आहे, पण जिथे नवीन कमर्शियल प्रोजेक्ट्स उभे राहत आहेत, तिथेच सरकारला रस का?” असा सवाल देखील ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Weather : पारा ४० पार…! उष्णता वाढल्याने हैराण; थंडाव्याच्या शोधात अमरावतीकर झाले त्रस्त

यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, “गाडगे बाबांची जन्मभूमी आणि निर्वाण भूमी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विकास आराखडा आजही अपूर्ण आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या वारशासाठी पैसे नाहीत, पण हनुमान गढीसाठी मात्र तातडीने निधी उपलब्ध होतो. इतर धार्मिक स्थळाच्या कामांसाठी वन विभागाचे अडथळे पुढे केले जातात, मग हनुमान गढीसाठी वनविभागाच्या नियमांचे उल्लंघन कसे काय चालते?” असा सवाल करत त्यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी टीका केली. सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्याच्या टॅक्सचा पैसा एखाद्या कमर्शियल जागेच्या फायद्यासाठी वापरणे हा जनतेचा अपमान असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान गढीला १२१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. खरे तर कमर्शियल जागेला पैसे दिलेले आहेत. पण हनुमानजींच्या नावाने दिलेले आहेत तर ठीक आहे. परंतु एकीकडे तुम्ही पौराणिक देवस्थानं सोडली, दुसरीकडे कमर्शियल लँड जिथे आहे, जिथे प्लॉटिंग सुरू झालेलं आहे,… pic.twitter.com/eeaGgzdOVK — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) March 16, 2026

‘मोदी-फडणवीस है तो मुमकिन है’

“एकीकडे पौराणिक श्रद्धास्थानांना पैसे द्यायला सरकारकडे निधी नाही आणि दुसरीकडे व्यावसायिक प्रकल्पाला १२१ कोटी दिले जातात, हे पाहून आश्चर्य वाटते. ‘मोदी है और फडणवीस है तो मुमकिन है’ असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे.

अयोध्येच्या मध्यभागी असलेले हनुमान गढी (हनुमान कोट) हे एक अत्यंत आदरणीय आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय सिद्धपीठ आहे. रामजन्मभूमीच्या जवळ असल्याने, दररोज हजारो भाविक मंदिराला भेट देतात, ज्यामुळे मंदिराभोवतीचा परिसर प्रसाद, पूजा साहित्य, हस्तकला आणि धार्मिक वस्तूंच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र बनतो.

अयोध्येच्या मध्यभागी स्थित, ज्यामुळे पर्यटकांना ते सुलभ होते.

दररोज हजारो भाविक मंदिराला भेट देतात, ज्यामुळे आजूबाजूच्या बाजारपेठांमध्ये लक्षणीय गर्दी होते.

मंदिराभोवती प्रसाद, रामनामी दुपट्टे, हनुमान मूर्ती आणि इतर धार्मिक वस्तू विकणारी असंख्य दुकाने.

मंदिर संकुलाच्या सभोवतालचा परिसर अत्यंत विकसित आहे आणि स्थानिक लोकांची उपजीविका प्रामुख्याने मंदिरावर अवलंबून आहे.

हरभरा-तूरच्या सरकारी खरेदीला आला वेग! अमरावती जिल्ह्यात १५ केंद्रांवर ९ हजार १४५ शेतकऱ्यांची झाली नोंदणी पूर्ण

Web Title: Why a crore 121 crore windfall for the commercial land of hanuman gadhi direct question from yashomati thakur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • amravati
  • Maharashtra Politics
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
2

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
4

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.