खालापूर : रायगड (Raigad landslide) जिल्ह्यात ईर्शाळगडाच्या (Irshalgad) पायथ्याशी असलेल्या ईर्शाळवाडीवर डोंगराची दरड कोसळली असून, मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 10 जणांचा ( 10 deaths) मृत्यू झाला असून 100 जणं या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ईर्शाळवाडीत एकूण 48 घरं असून त्यातल्या 18 घरांवर दरड कोसळली असल्याचं सांगण्यात येतंय. गावाची लोकसंखअया 227 च्या आसपास आहे. त्यातील 80 जण सुखरुप असल्याचं समोर आलं आहे. तर 10 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. उर्वरित 100 जणं या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या दुर्घटनेत 21 जणं जखमी झाल्याची माहितीही देण्यात आलीय. दरम्यान, सकाळी बचावकार्य सुरु असताना पहाटे पाच वाजता दम लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अग्निशमन दलाच्या दोन जवानाचा मृत्यू
घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. दरम्यान, सकाळी बचावकार्य सुरु असताना पहाटे पाच वाजता दम लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेलीकॉप्टरने बचावकार्य लांबणीवर…
पावसाचा जोर अजून अधिक प्रमाणात वाढल्या कारणाने हेलीकॉप्टरने बचावकार्य करण्याची शक्यता अजून लांबणीवर गेली आहे. तसेच ईर्शाळगडाजवळ हेलिकॉप्टर तसेच जेसीबीही नेण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळं गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे, तो मोठ्या प्रमाणात निसरड आहे. त्यामुळं अग्निशमन दलाला देखील तिथे पोहचण्यास अडथळे येताहेत. अजूनही प्रचंड पाऊस पडत आहे. सकाळी पाच वाजता बचावकार्य सुरु असताना, गडावर पोहचत असताना, दम लागल्यानं अग्निशमन दलातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं येथे इयरलिफ्ट करण्याचा विचार होऊ शकतो का, यावर चर्चा सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सकाळी बचावकार्य सुरु असताना पहाटे पाच वाजता दम लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.