मयुर फडके, मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Businessman Mukesh Ambani) अँटिलिया निवासस्थानाबाहेर (Antillia Residence) सापडलेली स्फोटकं (Explosives Scare Case) आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren Death Case) माजी पोलीस अधिकारी सुनील मानेकडून (Sunil Mane) माफीचा साक्षीदार (Approver) होण्यासाठी केलेला अर्ज मंगळवारी मागे घेण्यात आला. या अर्जाला राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) विरोध केला होता.
कारागृहात राहिल्यावर केलेल्या चुकांचा पश्चाताप झाला म्हणूनच माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतल्याचे मानेने फेब्रुवारी मिहन्यात केलेल्या अर्जात नमूद केले होते. २६ वर्षांच्या कारकिर्दीत कामगिरीचे चांगल्या पद्धतीने मूल्यांकन केले गेले. केंद्र तसेच राज्य सरकारचे पुरस्कारही मिळाले.
दुर्दैवाने आणि नकळत आपल्याकडून चुका झाल्या त्या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी पीडितांना न्याय देण्यासाठी या प्रकरणातील घटनाक्रम आणि तथ्ये सांगण्याचा निर्णय घेतल्याचे मानेने म्हटले होते तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत न्यायालयाकडे माफीची मागणीही केली होती. त्या अर्जाला (एनआयए) विरोध केला होता.
[read_also content=”मुझफ्फरनगर दंगलीत महिलेवर Gang Rape करणाऱ्या दोन आरोपींना 20-20 वर्षांची शिक्षा, 65 जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/crime/muzaffarnagar-riots-update-imprisonment-for-two-accused-of-gang-raping-woman-in-uttar-pradesh-nrvb-396886.html”]
या प्रकरणात माने इतर आरोपींप्रमाणेच सामील असल्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी एनआयएने केली होती. अर्जावरील सुनावणी प्रलंबित असतानाच मानेकडून अर्ज मागे घेण्यात आला. तसेच या खटल्यात आपली बाजू स्वतः मांडणार असल्याचे सांगून त्याबाबत परवानगीही मागितली.
या खटल्यातील मुख्य आरोपी आणि माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेविरोधात तळोजा कारागृहाकडून मंगळवारी विशेष न्यायालयात तक्रार करण्यात आली. तक्रारीनुसार, २३ एप्रिल रोजी वाझेला चक्कर आणि उलट्या होत होत्या. त्यामुळे वाझेला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते. परंतु, वाझेने तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 9 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-9-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
यापूर्वी वाझेकडून कारागृहात योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार आली होती आणि भविष्यातही अशीच तक्रार करण्याची शक्यता असल्याने कारागृह अधिकाऱ्यांनी सदर घटना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली तसेच या प्रकरणी न्यायालयाने वाझेला समज द्यावी, अशी मागणी तक्रारीत केली.
मात्र, वाझेला वैद्यकीय नोंदी न दाखवता दाखल करण्यास सांगितले होते. तसेच वाझेला कारागृहातील स्वच्छतेची चिंता होती. कारण, कारागृहामधील रुग्णालयात गर्दी असते आणि त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचेही वाझेच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.






