काठमांडू एअरपोर्टवर उडाली खळबळ (फोटो- istockphoto)
नेपाळमधील काठमांडू एअरपोर्टवर उडाली खळबळ
रद्द करण्यात आल्या सर्व फ्लाइट्स
रन- वे वर तांत्रिक अडचण आल्याने उड्डाणे रद्द झाल्याची माहिती
Kathmandu Airport: काठमांडू हे नेपाळमधील सर्वात व्यस्त असलेले एअरपोर्ट आहे. काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. त्यामुळे येथील एअरपोर्ट हे नेपाळमधील सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे. दरम्यान काठमांडू एअरपोर्टवरून एक मोठी बातमी समोर आली आहे. काठमांडू एअरपोर्टवरील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काठमांडू येथील त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आज या एअरपोर्टवरील उड्डाणे अचानक थांबवण्यात आली. रन-वे वरील एअरफील्ड लायटिंगमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. एअरफील्ड लायटिंगमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने रन-वे वर अंधार झाला.
All flight movement in Nepal's Tribhuvan International Airport halted following a technical glitch in the lights along the runway, according to airport officials More details awaited. — ANI (@ANI) November 8, 2025
तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे सर्व उड्डाणे थांबवण्यात आली. टेक्निकल टीम लगेच कामाला लागली. सध्या रन-वे चे काम केले जात आहे. जोवर ही अडचण दूर होत नाही तोवर उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. अचानक ही समस्या निर्माण झाल्याने नेपाळमधून बाहेर जाणाऱ्या आणि नेपाळमध्ये येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
ढगात कसे झाले ट्रॅफिक जाम, फ्लाईट्सवर कसे ठेवण्यात येते नियंत्रण?
शुक्रवारी सकाळी दिल्ली विमानतळावर झालेल्या एका मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली, ज्यामुळे ३०० हून अधिक उड्डाणे उशिरा झाली आणि प्रवासी अडकून पडले. दिल्लीनंतर, मुंबई आणि उत्तर भारतातील अनेक विमानतळांवर तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ निर्माण झाला. कारण असे दिले गेले की दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) सिस्टममधील एका मोठ्या समस्येमुळे उड्डाण ऑपरेशन्सवर परिणाम झाला आहे. सॉफ्टवेअर समस्येमुळे सुमारे ३०० उड्डाणांच्या हालचालींवर थेट परिणाम झाला. परिणामी, एटीसी मॅन्युअली फ्लाइट ऑपरेशन्स व्यवस्थापित करत आहे.
Explainer: ढगात कसे झाले ट्रॅफिक जाम, फ्लाईट्सवर कसे ठेवण्यात येते नियंत्रण? ATC सिस्टिम म्हणजे काय
एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम म्हणजे काय?
एटीसी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम. या सिस्टममध्ये एक टीम असते जी विमानांच्या स्थितीचे निरीक्षण करते आणि रडार आणि रेडिओ वापरून मार्गदर्शन प्रदान करते. एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम वैमानिकांशी सतत संपर्कात असते आणि त्याचा प्राथमिक उद्देश विमानांमधील सुरक्षित अंतर सुनिश्चित करून सुव्यवस्थित हवाई वाहतूक राखणे आहे. ही सेवा खाजगी, लष्करी आणि व्यावसायिक सर्व प्रकारच्या विमानांना दिली जाते.






