हरमनप्रीत कौर 'लेस्बियन' असण्याचा दावा करण्यात आला(फोटो-सोशल मीडिया)
Harmanpreet Kaur claims to be a lesbian : मागील आठवड्यात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका संघाला ५२ धावांनी पराभूत करत पहिले विश्वविजेतेपद जिंकले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौरचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान मात्र एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन हरमनप्रीत कौर लेस्बियन असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. नेमकं प्रकरण काय आहे? हे आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : ‘यापुढे शोमध्ये क्रिकेटपटूला आमंत्रण नाही…’, करण जोहरचा विराट कोहलीबद्दल मोठा खुलासा, कारण बनले ‘हे’ खेळाडू
एका इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील एका अकाउंटने हरमनप्रीत कौरवर लेस्बियन असल्याचा आरोप करण्यात आल्याने सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. हरमनप्रीत कौरने नुपूर कश्यपच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे.
हरमनप्रीत कौरने केलेल्या पोस्टवर एक कॉमेंट करण्यात आली. त्यामध्ये असे लिहिले आहे की, “ती(कौर)तिची सर्वात चांगली मैत्रीण आहे, तिची प्रेयसी देखील आहे. ते भागीदार आहेत. २०२३ च्या वाढदिवसाच्या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझे संपूर्ण जग नुपूरसाठी. चार तासांनंतर तिने ते काढून टाकले. कारण लोकांनी तिच्यावर टीका केली. म्हणूनच आता तिने फक्त सर्वोत्तम मित्र जग लिहिले. तिचे खरे चाहते याबद्दल चांगले जाणतात. समलैंगिक असणे ही लज्जास्पद गोष्ट नाही. ती २००८ पूर्वीपासून तिच्या (हरमन) सोबत राहिली आहे. आता, ते एकत्र राहत आहेत.” सोशल मीडिया चाहत्यांनी X वर (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) व्यक्त केले.
सोशल मीडियावर हरमनप्रीत कौर ‘लेस्बियन’ असल्याचा धक्कादायक दावा केल्याने वाद निर्माण झाला आहे. नुपूर कश्यप ही रिपीट७ ची मालक आहे, जी क्रीडा व्यवस्थापन आणि खेळाडू प्रतिनिधित्वात विशेषज्ञता असलेली एक कंपनी आहे, जिथे ती कौरसाठी टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहते. तीने कौरच्या कारकिर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी घेतली आहे.
I was today years old when I got to know that Harmanpreet is l*sbian😭. pic.twitter.com/oykFLlL7hJ — mutual.stark (@mutualstark) November 8, 2025
सोशल मीडियावर हरमनप्रीत कौर ‘लेस्बियन’ असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तिने पुढे लिहिले आहे की, “त्यांच्या मालमत्ता, आयुष्य, दुःख, आनंद आणि सर्व काही शेअर करणे. हरमनच्या प्रसिद्धीपूर्वीपासून नुपूर हरमनसोबत राहिली आहे. ती तिची कणा असून आता मला कसे कळते ते विचारू नका. मी २०१८ पासून दोघांना देखील फॉलो करत आहे आणि मी माझ्या आईच्या इंस्टाग्राम अकाउंटचा वापर करून त्यांना फॉलो करत आहे. त्यावेळी मी २०१६ पासून त्यांच्या सर्व कथा आणि सर्व पोस्ट पाहिल्या आहेत. नुपूरसाठी हे शब्द. आदरास पात्र आहे.” असे लहिले आहे. आता या प्रकरणावर हरमनप्रीत नेमकी काय प्रतिक्रिया देते? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.






