सांगली : रातोरात स्टार झालेली सोशल मीडिया स्टार नृत्यागंना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या सांगलीतील (Sangli) लावणीच्या कार्यक्रमाची चर्चा चांगलीच रंगली आहे. मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी ३० ऑक्टोबर रोजी गजराज मंडळाकडून गावातल्या नामवंत व्यक्तींच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी सोशल मीडिया स्टार असणाऱ्या गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत स्टेजवर येत प्रेक्षकांनी गाण्यावर ठेका धरला होता. तसेच शाळेच्या छतावर जाऊन लोकांनी कार्यक्रम पाहिला होता. दरम्यान, या हुल्लडबाजीनंतर सोशल मीडिया स्टार नृत्यागंना गौतमी पाटील हिने झालेल्या सर्व प्रकारानंतर माफी मागितली आहे. एवढे प्रेक्षक जमा होतील असं वाटलं नव्हतं, असं गौतमी पाटीलनं म्हटलं आहे. त्यामुळं मी याची माफी मागते असं गौतमीनं म्हटलंय.
[read_also content=”वेदांता प्रकल्पावरून सरकार भ्रम निर्माण करतेय, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/opposition-leader-ambadas-danve-accuses-shinde-fadnavis-government-about-vedanta-project-341200.html”]
दरम्यान, बेडग गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी उसळली होती, यावेळी शाळेच्या कौलांचे मोठ्या प्रमाणात नासधूस झाली होती. या प्रकारानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता, तर आयोजक गजराज मंडळाकडून शाळेच्या डागडुजीचे काम स्वखर्चाने सुरू केले आहे. तसेच याच दरम्यान सापडलेल्या मृतदेहा प्रकरणी पोलिसांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. दारुच्या नशेत पडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.