Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी; महिलांची धाकधूक वाढली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2026 | 08:24 AM
आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी

आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या 81 लाख लाडक्या बहिणींपैकी 62 लाख लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही. अनेक लाडक्या बहिणीने सरकारच्या निकषांना घाबरूनच ती केवायसी केलेली नाही, असे लक्षात आले आहे. त्यामुळे पात्र असलेल्या लाडक्या बहिणीची पुन्हा ही केवायसी पडताळणी केली जाईल, असे आश्वासन महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यातील लाडक्या बहिणींना दिले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे, अशाही अर्जदारांची माहिती आरटीओ विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे. काही अर्जदारांनी विहित कालावधीत ई-केवायसी न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासनही तटकरे यांनी दिले.

80 लाख महिलांचा लाभ बंद

महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सद्यस्थितीत, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि अपात्र ठरलेल्या तब्बल ८० लाख महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. छाननीनंतर आता सुमारे १.६८ कोटी महिलांनाच दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळत आहे.

लाभार्थ्यांचा होणार पुनर्पडताळणीत विचार

ज्या अर्जदारांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचा “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची ग्वाही देते, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

‘२४ हजार कोटींचा फटका!’ ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होत्या, तर २० महिने लाभ का दिला? जयंत पाटलांचा सरकारला सवाल

Web Title: Applications from eligible women will now undergo re verification of ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • Government Scheme
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

‘२४ हजार कोटींचा फटका!’ ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होत्या, तर २० महिने लाभ का दिला? जयंत पाटलांचा सरकारला सवाल
1

‘२४ हजार कोटींचा फटका!’ ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होत्या, तर २० महिने लाभ का दिला? जयंत पाटलांचा सरकारला सवाल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप
2

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का; बँक पडताळणीनंतर ८१ लाख महिला अपात्र! अहिल्यानगरसह राज्यात महिलांकडून नाराजी
3

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का; बँक पडताळणीनंतर ८१ लाख महिला अपात्र! अहिल्यानगरसह राज्यात महिलांकडून नाराजी

CM Devendra Fadnavis News: लाडकी बहीण योजनेतील ८० लाख लाभार्थी का वगळले? मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
4

CM Devendra Fadnavis News: लाडकी बहीण योजनेतील ८० लाख लाभार्थी का वगळले? मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.