Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का; बँक पडताळणीनंतर ८१ लाख महिला अपात्र! अहिल्यानगरसह राज्यात महिलांकडून नाराजी

राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल समोर आला असून बँक पडताळणी, ई-केवायसी आणि उत्पन्न छाननीनंतर तब्बल ८१ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 02, 2026 | 11:09 AM
'लाडकी बहीण' योजनेला मोठा कात्री; बँक पडताळणीनंतर ८१ लाख महिला अपात्र! अहिल्यानगरसह राज्यात महिलांकडून नाराजी (फोटो सौजन्य- पोपट पिटेकर)

'लाडकी बहीण' योजनेला मोठा कात्री; बँक पडताळणीनंतर ८१ लाख महिला अपात्र! अहिल्यानगरसह राज्यात महिलांकडून नाराजी (फोटो सौजन्य- पोपट पिटेकर)

Follow Us
Follow Us:
  • लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का!
  • राज्यातील ८१ लाख महिला अपात्र
  • ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत मोठी कपात
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : राज्यात मोठ्या गाजावाजासह सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेबाबत एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या गेमचेंजर ठरलेल्या या योजनेतील तब्बल ८१ लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. बँक पडताळणी, ई-केवायसी मोहीम आणि कौटुंबिक उत्पन्नाच्या माहितीची काटेकोर छाननी केल्यानंतर महिला व बालविकास विभागाने ही मोठी कपात केली आहे. या धडक कारवाईमुळे सुरुवातीला मोठ्या संख्येने लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

२.४७ कोटींवरून १ कोटी ६६ लाखांवर संख्या

योजनेच्या सुरुवातीला कोणतीही कडक तपासणी नसताना सरसकट सर्वांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते, ज्यामुळे सुरुवातीला लाभार्थींची संख्या २.४७ कोटींवर पोहोचली होती. मात्र, पडताळणीदरम्यान यामध्ये अनेक बोगस लाभार्थी असल्याचे आणि काही ठिकाणी चक्क पुरुष तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले.

CM Devendra Fadnavis News: लाडकी बहीण योजनेतील ८० लाख लाभार्थी का वगळले? मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

या प्रकारानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विभागाने बँक खाती आणि आधार जोडणीची अत्यंत कडक पडताळणी सुरू केली. या कडक मोहिमेमुळे आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २.४७ कोटी असलेली लाभार्थींची संख्या, आगामी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २.३८ कोटींवर आली होती. त्यानंतर ई-केवायसी मोहिमेची मुदत अनेकदा वाढवून देण्यात आली. अखेर एप्रिल अखेरपर्यंत झालेल्या अंतिम छाननीनंतर केवळ १ कोटी ६६ लाख महिलाच या अनुदानासाठी खऱ्या अर्थाने पात्र ठरल्या आहेत, म्हणजेच तब्बल ८१ लाख महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत.

‘बोगस लाभार्थ्यांवर कारवाई आवश्यक…’

या संपूर्ण प्रकरणावर आणि महिलांमध्ये पसरलेल्या नाराजीवर राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल भगिनींना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात काही ठिकाणी बोगस अर्ज दाखल झाले, पुरुषांनी किंवा सरकारी नोकरीत असणाऱ्या अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याचे समोर आले. शासकीय निधीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी बँक खाती अन् ई-केवायसीची पडताळणी करणे गरजेचे होते.” पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “या कडक छाननीमुळे बोगस लाभार्थी नक्कीच बाहेर पडले आहेत, ही प्रशासकीय प्रक्रिया आहे. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे किंवा ई-केवायसी न झाल्यामुळे जर एखादी खरी गरजू आणि पात्र महिला वंचित राहिली असेल, तर तिच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. अशा पात्र महिलांना पुन्हा संधी मिळवून देण्यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या जातील.”

महिलांकडून संताप व्यक्त

८१ लाख महिला अपात्र ठरल्याचे वृत्त समजताच अहिल्यानगर जिल्ह्यातील गावागावांमध्ये आणि शहरांमधील महिलांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. बँक खाती आणि आधार लिंक असूनही तांत्रिक त्रुटींमुळे नाव बाद झाल्याचा आरोप अनेक महिला करत आहेत. “निवडणुका संपल्यानंतर सरकारने नियमांचा जाच वाढवून हक्काचे पैसे नाकारले आहेत,” अशी भावना काही संतप्त महिलांनी ‘महिला चौपाल’मध्ये बोलताना व्यक्त केली. ऐन महागाईच्या काळात महिनाभराचा हातभार लावणाऱ्या या योजनेतून अचानक नाव वगळले गेल्याने महिला वर्गात मोठी चिंतेची आणि नाराजीची लाट आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला बाद? आदिती तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाल्या….

Web Title: Ladki bahin yojana 81 lakh women disqualified after ekyc verification maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Ladki Bahin Yojana
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.