Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विषयांना प्रशासकांची मंजुरी

स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे २१ कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 19, 2022 | 05:10 PM
स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विषयांना प्रशासकांची मंजुरी
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे २१ कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये प्रभाग क्र. २१ मधील नवीन जिजामाता रुग्णालयात तसेच प्रभाग क्र. २३ मधील थेरगाव रुग्णालयात सुसज्ज ऑपरेशन थिएटर तयार करणे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन आणि पुनर्वसन विभाग इमारतीच्या दुस-या मजल्यावर लाईट हाउस प्रकल्पाकरीता आवश्यक स्थापत्य विषयक कामे करणे आदी विषयांचा समावेश होता.

स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या कायदा विभागाकडील “विधी अधिकारी” या अभिनामाचे पद एकत्रित मानधनावर हंगामी स्वरुपात सहा महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे. त्याकामी येणा-या खर्चास बैठकीत मान्यता दिली. महापालिकेच्या आकूर्डी गुरुद्वारा चौकापासून ते राजयोग कॉलनी पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे. याकामी ७ कोटी १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

[read_also content=”मुल होण्यासाठी म्हणून गुंगीच्या गोळ्या देत महिलेवर बलात्कार… https://www.navarashtra.com/maharashtra/woman-raped-by-giving-gungi-pills-to-get-child-nrdm-305915.html”]

दिघी येथील बी.ई.जी. हद्दीमध्ये महापालिकेमार्फत ५० हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांचे २ वर्षांसाठी देखभाल आणि संरक्षण करण्याकामी वनविकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. यासाठी येणा-या १ कोटी ९६ लाख रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या इ क्षेत्रीय विद्युत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रस्तावित मोशी उप- अग्निशमन केंद्र येथे अग्निशमन संबंधित विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या ७३ लाख रुपये खर्चास तसेच विविध इमारतींमधील फायर अलार्म व फायर फायटिंग यंत्रणेची वार्षिक पद्धतीने देखभाल दुरुस्तीकामी येणाऱ्या ५० लाख रुपये खर्च होणार आहे. महापालिका हद्दीमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन्स उभारण्यात येत आहे. यासाठी आवश्यक मशिनरी आणि विद्युत विषयक कामे करण्यासाठी ९ कोटी ३८ लाख रुपये खर्चास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Web Title: Approval by the administrators of matters requiring the approval of the standing committee and the municipal assembly nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2022 | 05:10 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA
  • Pimpri Chinchwad
  • Rajesh Patil

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक
1

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
2

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
4

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.