Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख

भोंदू बाबा अशोक खरातच्या अघोरी कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा आणि अघोरी पूजेचा संबंध जोडला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 22, 2026 | 06:53 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मिटकरी यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा आणि अघोरी पूजेचा संबंध जोडलाय
  • राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली
  • या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरेही बाहेर येत आहेत.
Ashok Kharat Case :  भोंदू बाबा अशोक खरातच्या अघोरी कृत्यांनी केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जागतिक स्तरावर एल्फिस्टन फाईल्स प्रमाणे महाराष्ट्रातही असा प्रकार आता उघडकीस आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर हे प्रकरण गाजत आहे. आता या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही उमटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा आणि अघोरी पूजेचा संबंध जोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत एसआयटीकडून वेगाने तपास सुरू आहे. अशात या प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यात अमोल मिटकरी यांनी दावा केला आहे की, या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरेही बाहेर येत आहेत.

Ashok Kharat Case : अरे हा माणूस आहे की शैतान! नवऱ्याला खोलीबाहेर ठेवून भोंदू बाबा खरातचा गरोदरबाईवर अत्याचार, गुन्हा दाखल

अजित दादांना संपवण्याचे षडयंत्र?

अमोल मिटकरी यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. नोव्हेंबर महिन्यात अजित पवारांच्या घराबाहेर आणि कार्यालयाजवळ अशीच एक अघोरी पूजा करण्यात आली होती. अशोक खरात आणि अजित दादांच्या अपघाताचा काही संबंध आहे का? याचा तपास होणे गरजेचे असल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित दादांचा विषय मागे पाडण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यांना संपवण्याचे हे मोठे षडयंत्र असू शकते, अशी शंकाही मिटकरींनी व्यक्त केली.

पाचशेहून अधिक धक्कादायक व्हिडिओ?

या प्रकरणात केवळ सामान्य लोकच नाही, तर मोठे अधिकारी आणि साक्षर लोकही या भोंदू बाबाच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे. मिटकरींच्या दाव्यानुसार, खरातकडे केवळ ५७ नाही, तर ५०० पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती आहे. यामध्ये काही बड्या अधिकाऱ्यांच्या पत्नींचाही समावेश आहे का? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

दोन हजार कोटींची मालमत्ता आली कुठून?

अशोक खरातची संपत्ती दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. एका भोंदू बाबाकडे एवढा पैसा येतो कुठून? त्याला पाणी कोणाच्या काळात आरक्षित करून दिले गेले? कोणत्या मंत्र्यांनी त्याला संरक्षण दिले? हे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहेत. महायुती असो वा अन्य कोणी, या प्रकरणातील गुन्हेगारांना सरकार पाठीशी घालणार नाही, असा विश्वासही मिटकरींनी व्यक्त केला.

संत परंपरेला काळीमा फासणारे कृत्य

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पण अशोक खरातने आपल्या कृत्यांनी या परंपरेला काळीमा फासली आहे असं म्हणत मिटकरींनी हल्लाबोल केला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेला ‘करंगळी कापण्याचा’ प्रकार हा अघोरी कृत्यांचा कळस होता. या प्रकरणात व्हीएसआर कंपनीचे मालक आणि अनेक राजकीय नेत्यांचे धागेदोरे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व प्रकरणांमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही राजीनामा द्यावा लागला असून, आता पोलीस तपासात आणखी कोणते मोठे चेहरे समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

चक्क Siddhivinayak मंदिरात चोरी! दानपेटीतून चोरले तब्बल ‘इतके’ रुपये; पोलिसांकडून तपास सुरु

Web Title: Ashok kharat aghori puja was held near ajit pawar house mla amol mitkari claims ajit pawar plane crash marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • ajit pawar news
  • ajit pawar plane crash
  • Amol Mitakari
  • Ashok Kharat
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.