Photo Credit -Social Media महाराष्ट्राच्या निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे असीम सरोदे स्पष्टच बोलले
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल हा अनाकलनीय आणि अविश्वसनीय आहे. महायुतीला एवढं राक्षसी बहुमत मिळेल असं राज्यात चित्रच नव्हतं. तरीही जी मते मिळाली ती अविश्वसनीय आहेत. या निकालाविरोधात आम्ही न्यायालयात निवणडणूक याचिका दाखल कऱमार आहोत, अशा शब्दांत अडव्होकेट असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचा काल निकाल जाहीर झाला.यात महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत 233 जागां मिळवत बहुमताचा आकडाही पार केला. पण राज्यभरातून अनेकांनी या निकालावर शंका व्यक्त केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यासंदर्भात बोलताना असीम सरोदे म्हणाले, “आपण जेव्हा मतदान करतो. ती प्रक्रिया पूर्ण झाली असे नाही, मी ज्याला मत दिलं त्याच्यापर्यंत ते पोहचलं का ते जर त्याच्यापर्यंत पोहचलं तरच ती मतदान प्रक्रिया पूर्ण होते.पण आता आपण कुणाला मतदान करत आहोत आणि ते मत कुणाला जातयं याबाबातही लोक संशय़ व्यक्त करत हेत. याबाबत कोर्ट कायदेशीर बाबी तपासू शकते. पण ही तांत्रिक बाजूदेखील आहेत. त्यामुळे या गोष्टी सिद्ध होऊ शकत नाही. पण राजकीय पक्षांनी त्याचा घाऊक पद्धतीने घ्यायचा कुठलीही लाट नसताना बहुमत मिळवायचं, अशा पद्धतीने बहुमत मिळत असेल तर ते अशा शंकांना वाट करून दिली आहे. त्यामुळए अनेकांनी कालच्या निकालाबाबत न्यायालयात जायचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आम्ही निवडणूक याचिका दाखल करणार आहोत.
कालच्या निकालात अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले, तेही तुमच्यासोबत असणार आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना सरोदे म्हणाले, अनेक पराभूत उमेदवारांना मला संपर्क केला आहे. तेही या निवडणुकीला कोर्टात आव्हान देणार आहेत. त्यानुसार प्रत्येक उमेदवार आणि त्याच्या मतदारसंघातील परिस्थिती काय होती, कोणकोणत्या प्रकारचे आक्षेप घेण्यात आले, ते पाहून आम्ही स्वतंत्र याचिका दाखल करणार आहोत.
Maharashtra Election Result 2024 : फडशा पडला पण तो मविआचा
काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या हरलेल्या प्रत्येक उमेदवाराने कोर्टात याचिका दाखल करावी निवडणुकीतील संपूर्ण प्रक्रियाच शंकास्पद आहे हे आम्हीच नव्हे तर सर्वसानामान्य माणूसही बोलत आहे. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयात दाद मागितलीच पाहिजे.
जर मोकळ्या आणि प्रामाणिक वातावरणात निवडणुका झाल्या नसतील तर त्या निवडणुकांना आव्हान दिलचं पाहिजे. काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या हरलेल्या उमेदवारांसह हरलेल्या अपक्ष उमेदवारांनीही माझ्याशी संपर्क साधला आहे. निवडणुकीतील हरलेला उमेदवारच नाही तर लोकशाही मानणारा सर्वसामान्य मतदारही या निवडणुकीच्या प्रक्रियेला आव्हान देऊ शकतो. मत दिल्यानंतर आपलं काम संपलं असं होत नाही. हतबलता व्यक्त न करता प्रत्येकाने ही कायदेशीर लढाई लढली पाहिजे असे माझे मत आहे.
प्रत्येक मतमोजणी केंद्रावर वेगवेगळे प्रकार झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ईव्हीएम एका कारमधून नेत होते, तेव्हा लोकांनी घेराव घालून ही कार अडवली, त्यातल्या ईव्हीएम पोलसांनी जप्त केले. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. त्यातलं सत्य आणि वास्तव लोकांसमोर आलं पाहिजे. काही ठिकाणी बेवारसपणे सुरू अवस्थेत ईव्हीएम सापडले होते, तर काही ठिकाणी इव्हीएम मशीनच्या चार्जिंगचे मुद्देही समोर आले. यातले अनेक मुद्दे हे तांत्रिक आहेत जे वकील म्हणून मला माहित नाही. पण शंका असतील तर न्यायालयातच व्यक्त झाल्या पाहिजेत, फक्त त्यावर बोलून चालणार नाही असेही सरोदे यांनी सांगितले.
महायुतीच्या वादळात ‘मविआ’चा सुपडा साफ; संख्याबळ नसल्याने ‘या’ नेत्यांची खासदारकी धोक्यात
तसेच 17 सी फॉर्म हा भरून देणे बंधनकारक आहे, त्यात कुठल्याही त्रुटी किंवा उणिवा ठेवणं चुकीचं आहे. अनेक उमेदवारांचा 500, एक हजार मतांनी पराभव झाला त्यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतल्या. त्यांनी व्हीव्हीपॅटसोबत मत पडताळणी करण्याची मागणी केली आहे. तुम्ही जी मतपडताळी केली आहे ते आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या काढा आणि स्लिपसोबत मतदपडताळी करा, अशी मागणी उमेदवारांना केली होती, त्या मागण्या फेटाळण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रावरचे निवडणूक अधिकारी जर एखाद्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली येत असतील तर हे सर्व न्यायालयात मांडले पाहिजे. कारण आपल्या देशात लोकशाही आहे आणि न्यायालयातच जाऊन आपण यंत्रणा शुद्धीकरण करू शकतो,असंही असीम सरोदे यांनी नमुद केलं.