...तर उद्धव सेनेचा १० जागांवर झाला असता दारूण पराभव; कट्टर विरोधक तरीही राज ठाकरेंनी अशी केली भावाची मदत
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. २०१४ मध्ये मोदी लाटेत कॉंग्रेसचा सुफडासाफ झाला तशीच लाट १० वर्षांनंतर महाराष्ट्रात पहायला मिळाली. महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडी भूईसपाट झाली. ठाकरे गटाला केवळ २० जागा मिळाल्या. मात्र जर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसती तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ १० जागांवरच समाधान मानावं लागलं असतं. त्यात ८ जागा मुंबई तर २ जागा राज्यातील इतर भागातील आहेत.
निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
जर राज ठाकरे यांनी या जागांवर उमदेवार दिले नसते तर १० जागांवर उद्धव ठाकरे यांना पराभवाला सामोरं जावं वागलं असतं, तेही एकनाथ शिंदेंच्या विरोधात. १० जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेल मिळाल्या असत्या. माहिम, वरली, विक्रोली, जोगेश्वरी ईस्ट, दिंडोशी, वर्सोवा, कलीना, वांद्रा ईस्ट, वनी, गुहागर, या त्या १० जागा आहेत जिथे मनसेचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला. त्यात आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाचाही समावेश आहे.
माहिम
मनसे उमेदवार: अमित ठाकरे
विजयी मतांचा फरक: 1,316 मत
उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : महेश सावंत (50,213 मत)
मनसेचे मत: 33,062
शिंदे गटाचे उमेदवार: सदा सरवणकर, हरले.
वरळी
मनसे उमेदवार: संदीप देशपांडे
विजयी मतांचा फरक : 8,801 मत
उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : आदित्य ठाकरे (63,324 मत)
मनसेचे मत: 19,367
शिंदे गटाचे उमेदवार: मिलिंद देवरा
विक्रोळी
विजयी मतांचा फरक : 15,526 मत
उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : (66,093 मत)
मनसेला मिळालेली मत : 16,813.
निवडणूक निकालासंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्कि करा
जोगेश्वरी ईस्ट
विजयी मतांचा फरक: 1,541 मत
उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : (77,044 मत)
मनसेला मिळालेली मत : 64,239.
दिंडोशी
विजयी मतांचा फरक : 6,182 मत
उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : (76,437 मत)
मनसेला मिळालेली मत : 20,309.
वर्सोवा
मनसेला मिळालेली मत : 1,600 मत
उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : (65,396 मत)
मनसेला मिळालेली मत : 6,752.
कलीना
विजयी मतांचा फरक : 5,008 मत
उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : (59,820 मत)
मनसेला मिळालेली मत : 6,062.
वांद्रा ईस्ट
विजयी मतांचा फरक : 11,365 मत
उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : (57,708 मत)
मनसेला मिळालेली मत : 16,074.
वनी
विजयी मतांचा फरक : 15,560 मत
उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : (94,618 मत)
मनसेला मिळालेली मत : 21,977.
गुहागर
विजयी मतांचा फरक : 2,830 मत
उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : (71,241 मत)
मनसेला मिळालेली मत : 6,712.
मनसेच्या उमेदवारांनी शिंदे गटाची 8 जागांवर मतं फोडण्यात यश मिळवलं. त्यामुळे शिवसेना (यूबीटी) मुंबईत आपली पकड राखण्यात यशस्वी झाली. विशेषतः वरली, माहिम आणि वांद्रा ईस्ट सारख्या जागा महत्त्वाच्या ठरल्या. जर मनसे या 10 जागांवर निवडणूक लढवली नसती, तर शिंदे गटाला या जागांवर फायदा होऊ शकला असता.
राज ठाकरे यांच्या पक्षाची ही अप्रत्यक्ष भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. मनसेचा परफॉर्मन्स शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरला आहे. मनसे भलेही एकही जागा जिंकली नसेल, तरीही त्यांचा प्रभाव निवडणुकीच्या निकालावर पडला आहे. येणाऱ्या काळात मनसेची ही भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार करू शकते.