Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीजबिलांची थकबाकी ७३ हजार कोटींवर, वीजबिलांचे पैसे हा महावितरणचा उत्पन्नाचा एकमेव स्रोत; शेती पंपधारकांनी पंधरा वर्षे भरली नाहीत बिले

महावितरण’च्या वीजग्राहकांच्या बिलांची थकबाकी तब्बल ७३ हजार ३६१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये सवलतीच्या दरात वीजपुरवठा घेणाऱ्या १५ लाख १९ हजार शेतीपंपधारक ग्राहकांनी मागील पाच वर्षांपासून एकदाही वीजबिल भरलेले नसून, त्यांच्याकडे २१ हजार ६७ कोटी रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2023 | 10:16 AM
वीजबिलांची थकबाकी ७३ हजार कोटींवर, वीजबिलांचे पैसे हा महावितरणचा उत्पन्नाचा एकमेव स्रोत; शेती पंपधारकांनी पंधरा वर्षे भरली नाहीत बिले
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महावितरण’च्या वीजग्राहकांच्या बिलांची थकबाकी तब्बल ७३ हजार ३६१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये सवलतीच्या दरात वीजपुरवठा घेणाऱ्या १५ लाख १९ हजार शेतीपंपधारक ग्राहकांनी मागील पाच वर्षांपासून एकदाही वीजबिल भरलेले नसून, त्यांच्याकडे २१ हजार ६७ कोटी रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे.

तर तीन लाख २३ हजार शेती पंपधारकांनी गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ एकही वीजबिलाचा भरणा केला नसून, त्यांच्याकडे ५ हजार २१६ कोटी रुपये थकित आहेत. ‘महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली.

‘घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व शेतीपंपधारक ग्राहकांनी अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी वीजबिले भरून सहकार्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘वीजेमुळे शेतीचे सिंचन होते. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांना चांगले आयुष्य जगता येते. तरीही त्यांच्या एकूण खर्चाच्या तुलनेत अल्प असलेले वीजबिल भरण्यास काही शेतकऱ्यांची अनास्था दिसते. काही ग्राहक मोबाइल बिल, डीटीएचचे बिल नियमित भरतात. मात्र, अत्यावश्यक सुविधा असलेल्या विजेचे बिल भरण्यास टाळाटाळ करतात, हे आश्चर्यकारक आहे,’ असे सिंघल यांनी नमूद केले.

‘वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, वाहतूक नियंत्रण, कार्यालयीन कामकाज, बँकिंग, इमारतीतील लिफ्ट अशा अनेक सेवा वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. अखंडित वीजपुरवठ्यासाठी ‘महावितरण’ला वीज खरेदी करावी लागते. महावितरणच्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के रक्कम वीजखरेदीवर खर्च होते.

मागील आर्थिक वर्षांत (२०२१-२२) ‘महावितरण’ने वीज खरेदीवर ६९ हजार ४७८ कोटी रुपये खर्च केले आहेत. वीजबिलांचे पैसे हा महावितरणचा उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे. त्यातून वीजखरेदीचे पैसे, कर्मचाऱ्यांचे वेतन व वीज प्रकल्पांचा खर्च भागविला जातो. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजबिले नियमित भरणे अधिक गरजेचे आहे,’ असेही ते म्हणाले.

Web Title: At 73000 crores in arrears of electricity bills electricity bill money is the only source of income for mahadistrivan farm pump owners have not paid bills for fifteen years nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2023 | 10:16 AM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • CM Ekanath Shinde
  • cmomaharashtra
  • Light Bill
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

“…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा
1

“…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप
2

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप

Maharashtra political : शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
3

Maharashtra political : शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Local Body Election: “… ही तर जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई”; MP ओम राजेंची भाजपवर टीका
4

Local Body Election: “… ही तर जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई”; MP ओम राजेंची भाजपवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.