Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकसरमध्ये साकारतेय ५० प्रजातींचे ‘घनवन’; अडीच हेक्टरमध्ये ३० हजार झाडांची लागवड, ग्रामपंचायतीने वन विभागाला दिली जागा

Atal Anand Ghanvan Miyawaki Plantation: वाई येथे ‘अटल आनंद घनवन’ योजनेंतर्गत मियावाकी पद्धतीने २.५ हेक्टर क्षेत्रावर सुमारे ३० हजार झाडांचे घनवन साकारण्यात येत आहे. स्थानिक प्रजातींच्या दाट लागवडीमुळे अल्पावधीत नैसर्गिक जंगलासारखी परिसंस्था निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 31, 2026 | 09:10 PM
एकसरमध्ये साकारतेय ५० प्रजातींचे ‘घनवन’; अडीच हेक्टरमध्ये ३० हजार झाडांची लागवड, ग्रामपंचायतीने वन विभागाला दिली जागा
Follow Us
Follow Us:
  • एकसरमध्ये साकारतेय ५० प्रजातींचे ‘घनवन’
  • अडीच हेक्टरमध्ये ३० हजार झाडांची लागवड
  • ग्रामपंचायतीने वन विभागाला दिली जागा
वाई : नामदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ‘अटल आनंद घनवन’ योजनेंतर्गत एकसर येथे मियावाकी पद्धतीने घनवन साकारण्यात येत आहे. ग्रामपंचायतीने वन विभागाला उपलब्ध करून दिलेल्या अडीच हेक्टर क्षेत्रावर सुमारे ३० हजार झाडांची लागवड करण्यात येणार असून, ५० हून अधिक स्थानिक प्रजातींचा यात समावेश आहे.

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल २०२.२० मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत

मियावाकी पद्धतीमध्ये कमी जागेत विविध स्थानिक प्रजातींची दाट लागवड केली जाते. त्यामुळे झाडांची वाढ जलद होऊन अल्पावधीत नैसर्गिक जंगलासारखी परिसंस्था निर्माण होण्यास मदत होते. यापूर्वी जांभळी येथे हा प्रयोग यशस्वीरीत्या राबविण्यात आला असून, त्याच धर्तीवर एकसर येथेही हे घनवन विकसित केले जात आहे. या घनवनामध्ये वड, पिंपळ, कडुनिंब, आवळा, चिंच, बहावा, अर्जुन, जांभूळ, शेवगा यांसह विविध स्थानिक प्रजातींची लागवड करण्यात येत आहे. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला असून, मियावाकी तंत्रानुसार चार स्तरांमध्ये झाडांची लागवड केली जात आहे.

या उपक्रमामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्याबरोबरच पक्षी, फुलपाखरे व अन्य जीवांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच कार्बन डायऑक्साइडचे शोषण, तापमान नियंत्रण आणि भूजल संवर्धनासाठीही घनवन उपयुक्त ठरणार आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध हरित वारसा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी नारायण घोलप, पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे, वनक्षेत्रपाल कुंडलिक होरे, वनपाल रजिया शेख, गवारी, भोसले, एकसरच्या सरपंच सुमन मालुसरे, माजी सरपंच मयूर चव्हाण, बाळकृष्ण तरडे, रमेश घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते घनवनातील रोपांची लागवड करण्यात आली.

एकीकडे कामाचा वणवा, दुसरीकडे तुकाराम मुंडेंना हायकोर्टाचा मोठा दणका! FDA समोर दुहेरी संकट; काय आहे प्रकरण?

Web Title: Atal anand ghanvan miyawaki forest project ekasar wai 30000 tree plantation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • Satara
  • Tree
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
1

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
2

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
3

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह
4

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.