Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: सोलापुरातील बालाजी अमाईन्सचा मोठा टप्पा; भारतात व्यावसायिक DME उत्पादन करणारी ठरली एकमेव कंपनी

बालाजी अमाईन्सने सोलापूरच्या चिंचोळी एमआयडीसी येथील युनिट-4 प्रकल्पात डायमिथाईल इथर (DME) उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या सुरू केला असून 20 मे 2026 पासून व्यावसायिक उत्पादनाला प्रारंभ झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2026 | 07:24 PM
सोलापुरातील बालाजी अमाईन्सचा मोठा टप्पा; भारतात व्यावसायिक DME उत्पादन करणारी ठरली एकमेव कंपनी

सोलापुरातील बालाजी अमाईन्सचा मोठा टप्पा; भारतात व्यावसायिक DME उत्पादन करणारी ठरली एकमेव कंपनी

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : बालाजी अमाईन्सने चिंचोळी एमआयडीसी, सोलापूर येथील आपल्या युनिट-४ प्रकल्पामध्ये डायमिथाईल इथर (DME) उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला असून दिनांक २० मे २०२६ पासून व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ करण्यात आला आहे. या यशामुळे व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे.

डीएमई हे एलपीजीमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ व कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते. अनेक पाश्चिमात्य व युरोपीय देशांमध्ये एलपीजीमध्ये २० टक्क्यांपर्यंत डीएमईचे मिश्रण करून त्याचा वापर केला जातो. कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी १,००,००० मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून डीएमईसाठी आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतासाठी डीएमई उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने बीआयएसने (BIS) नुकताच नवीन आयएस कोड प्रसिद्ध केला असून त्यानुसार एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रण करू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) आता डीएमई मिश्रण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

Dharashiv News : भूममधील बौद्ध विहार हल्ल्याप्रकरणी संताप; आरपीआयकडून ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत कारवाईची मागणी

जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पर्यायी इंधनांचा विकास ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. डीएमईच्या वापरामुळे भारताची एलपीजी आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतामधील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्यामुळे उत्पादन साठवण, हाताळणी, वापर, वाहतूक तसेच रोड टँकरद्वारे परिवहन यांसंदर्भातील पुरेशा भारतीय मानकांच्या अभावामुळे PESO परवानग्या व इतर वैधानिक मंजुरी मिळविताना कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय मानकांचा संदर्भ घेऊन त्यांचे परीक्षण व पडताळणी करत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी बालाजी अमाईन्स एरोसोल उद्योग तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये हीटिंगसाठी इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास पूर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री. गोविंद मेंचेकरे तसेच महाव्यवस्थापक श्री. विनय दुर्गम उपस्थित होते.

यावेळी डी. राम रेड्डी यांनी कंपनीच्या भविष्यातील धोरणाबाबत माहिती देताना सांगितले की, बालाजी अमाईन्स भारतातील ईव्ही बॅटरी केमिकल्स क्षेत्रात अग्रगण्य भूमिका बजावण्यासाठी वेगाने विस्तार करत आहे. ईव्ही बॅटरी क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीने लक्ष केंद्रित केले असून भविष्यात विद्यमान काही प्रकल्पांचे पुनर्रचना करून नव्या पिढीतील ईव्ही बॅटरी केमिकल्स उत्पादनासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे.

डायमिथाईल कार्बोनेट (DMC) – इलेक्ट्रॉनिक ग्रेड

डीएमसीचा वापर ईव्ही बॅटरी इलेक्ट्रोलाइट्समध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतात या रसायनाचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव कंपनी असून कंपनीकडे सध्या वार्षिक १५,००० मे. टन उत्पादन क्षमता उपलब्ध आहे. अत्यल्प अतिरिक्त खर्चात ही क्षमता वाढविण्याची क्षमता कंपनीकडे आहे.

एन-मिथाईल पायरोलिडोन (NMP) – इलेक्ट्रॉनिक ग्रेड

एनएमपीचे उत्पादन बालाजी अमाईन्स गेल्या दोन दशकांपासून करत असून आता कंपनीने ईव्ही बॅटरी ग्रेड सॉल्व्हेंट विकसित केले आहेत. देशभर उभारल्या जाणाऱ्या गिगा वॅट क्षमतेच्या ईव्ही बॅटरी प्रकल्पांना पुरवठा करण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे. डीएमसी व एनएमपी या दोन्ही रसायनांचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी आहे. या सर्व घडामोडींमुळे विशेष रसायन क्षेत्रातील विविध विभागांमध्ये कंपनी अग्रस्थानी असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

Sharad Pawar: “मुंबईत रंगला शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर; शरद पवार आणि खासदार नीलेश लंकेंची ‘आपला मावळा’साठी मोठी घोषणा!

Web Title: Balaji amines starts commercial dme production solapur chincholi midc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • india
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur महापालिकेची अवैध बांधकामांवर धडक कारवाई; ११ गाळ्यांवर बुलडोझर, परिसरात खळबळ
1

Solapur महापालिकेची अवैध बांधकामांवर धडक कारवाई; ११ गाळ्यांवर बुलडोझर, परिसरात खळबळ

Kia India : किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची मोठी भागीदारी; भारतातील टेनिसला मिळणार नवी चालना
2

Kia India : किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची मोठी भागीदारी; भारतातील टेनिसला मिळणार नवी चालना

Solapur Municipality: महापालिकेत शिस्तीचा नवा अध्याय! जूनपासून 4300 अधिकारी-कर्मचारी एकाच गणवेशात दिसणार
3

Solapur Municipality: महापालिकेत शिस्तीचा नवा अध्याय! जूनपासून 4300 अधिकारी-कर्मचारी एकाच गणवेशात दिसणार

Devendra Fadnavis : महाराष्ट्र बनेल न्यूक्लिअर पॉवर हब? अमेरिकन कंपन्यांसोबत गुंतवणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा
4

Devendra Fadnavis : महाराष्ट्र बनेल न्यूक्लिअर पॉवर हब? अमेरिकन कंपन्यांसोबत गुंतवणुकीवर मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.