Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur महापालिकेची अवैध बांधकामांवर धडक कारवाई; ११ गाळ्यांवर बुलडोझर, परिसरात खळबळ

सोलापूर महानगरपालिकेने शहरातील अवैध बांधकामांविरोधातील धडक मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवत गुरुवार पेठ आणि शनिवार पेठ परिसरात मोठी कारवाई केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 20, 2026 | 07:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • कारवाईमुळे अवैध बांधकामधारकांमध्ये मोठी खळबळ
  • कायदेशीर नोटीस प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करण्यात आली
  • पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा दिला आहे.
सोलापूर महानगरपालिकेने शहरातील अवैध बांधकामांविरोधात सुरू केलेली धडक मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवत गुरुवार पेठ आणि शनिवार पेठ परिसरात मोठी कारवाई केली आहे. पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या तब्बल ११ गाळ्यांवर महापालिकेच्या पथकाने बुलडोझर चालवत कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध बांधकामधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Solapur News: सोलापुरातील बालाजी अमाईन्सचा मोठा टप्पा; भारतात व्यावसायिक DME उत्पादन करणारी ठरली एकमेव कंपनी

ही कारवाई महापालिकेच्या ९६ अवैध बांधकाम प्रकरणांच्या अंतर्गत करण्यात आली. गुरुवार पेठेतील ताहेर बागवान आणि शनिवार पेठेतील खुदाबक्ष बागवान यांच्या इमारतींमध्ये पार्किंगसाठी राखीव जागेचा व्यावसायिक वापर करून अनधिकृत गाळे उभारण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर कायदेशीर नोटीस प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकाने सकाळपासूनच यंत्रसामग्रीच्या मदतीने पाडकाम मोहीम राबवली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, मात्र अखेर ही कारवाई शांततेत पार पडली. या मोहिमेत कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, उपअभियंता आनंद जोशी, सहाय्यक अभियंते शकील शेख, इर्शाद झरतार, कनिष्ठ अभियंते गणेश काकडे, बसवराज बडगा, सलमान मणियार, दयानंद अवताडे, दिपाली मेटकरी, प्रमोद गोविंदवार तसेच अतिक्रमण विभागाचे दीपक कुंभार उपस्थित होते. तसेच जेलरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राऊत आणि त्यांचे पथकही बंदोबस्तासाठी तैनात होते.

Mumbai News: उष्णतेचा हृदयावर वाढता परिणाम? मुंबईत मध्यमवयीन पुरुषांमध्ये हार्ट अटॅक प्रकरणांत चिंताजनक वाढ

महापालिका प्रशासनाने शहरातील अवैध बांधकामांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा दिला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून उभारलेली बांधकामे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Solapur municipal corporation launches crackdown on illegal constructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: सोलापुरातील बालाजी अमाईन्सचा मोठा टप्पा; भारतात व्यावसायिक DME उत्पादन करणारी ठरली एकमेव कंपनी
1

Solapur News: सोलापुरातील बालाजी अमाईन्सचा मोठा टप्पा; भारतात व्यावसायिक DME उत्पादन करणारी ठरली एकमेव कंपनी

Solapur Municipality: महापालिकेत शिस्तीचा नवा अध्याय! जूनपासून 4300 अधिकारी-कर्मचारी एकाच गणवेशात दिसणार
2

Solapur Municipality: महापालिकेत शिस्तीचा नवा अध्याय! जूनपासून 4300 अधिकारी-कर्मचारी एकाच गणवेशात दिसणार

Accident: सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू
3

Accident: सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

Solapur News : जुळे सोलापुरातील होंडा दुचाकी गोडाऊनला भीषण आग; २५ लाखांचे नुकसान, दोन कोटींचा माल वाचला
4

Solapur News : जुळे सोलापुरातील होंडा दुचाकी गोडाऊनला भीषण आग; २५ लाखांचे नुकसान, दोन कोटींचा माल वाचला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.