Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara: तासवडे टोलनाक्यावर संतापाचा स्फोट; माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे चक्काजाम आंदोलन, प्रशासनाला इशारा

मायणी-पंढरपूर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासवडे टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन. १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 01, 2026 | 06:32 PM
माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे चक्काजाम आंदोलन

माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे चक्काजाम आंदोलन

Follow Us
Follow Us:

 

  • तासवडे टोलनाक्यावर संतापाचा स्फोट
  • माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे चक्काजाम आंदोलन
  • प्रशासनाला इशारा
उंब्रज / प्रतिनिधी: मायणी–पंढरपूर मार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम, प्रचंड दिरंगाई आणि वाहनधारक व शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ १ मे रोजी तासवडे टोलनाक्यावर जोरदार चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे माजी आमदार तथा माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात जिल्हा परिषद माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. अचानक झालेल्या या चक्काजाममुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली आणि प्रशासनाची तारांबळ उडाली.

पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत ठेकेदार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. “मायणी–पंढरपूर रस्ता पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. आम्ही मंत्री असताना या कामाचा पाया घातला होता, मात्र सत्तांतरानंतर ठेकेदारांनी मनमानी सुरू केली. सिमेंट काँक्रीट रस्त्यावर २१ दिवस पाणी मारणे आवश्यक असते, पण येथे दुसऱ्याच दिवशी वाहने सोडली जात आहेत. हा लोकांच्या जीवाशी खेळ आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

ते पुढे म्हणाले की, उंब्रजपासून कृष्णा नदी ओलांडल्यानंतर तीन महिन्यांपासून काम बंद आहे. अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण ठेवण्यात आला असून त्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे. “पोलीस प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे,” असा आरोप त्यांनी केला. पाटील यांनी ठेकेदारांवर गंभीर आरोप करत सांगितले की, “हॉटेलसमोर गटार खाली करून त्यांच्या व्यवसायाला चालना दिली जाते, तर शेतकऱ्यांच्या शेतासमोर गटार वर करून त्यांना रस्त्यावर येण्यापासून रोखले जाते. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.”

New Khambatki Tunnel: खंबाटकी बोगदा चाचणीसाठी खुला; पुणे–सातारा प्रवास होणार अधिक जलद आणि सुरक्षित

गेल्या दीड वर्षात आठ वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळेच हे आंदोलन उभारावे लागले, असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येत १५ मेपासून काम सुरू करून १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर आश्वासनाप्रमाणे काम झाले नाही, तर यापेक्षाही मोठे आणि उग्र आंदोलन उभारले जाईल.

शेतकरी, कामगार आणि वाहनधारकांचा संयम आता संपत चालला आहे.” दरम्यान, ‘दै. नवभारत’ने मायणी–मल्हारपेठ रस्त्यावरील निकृष्ट कामांबाबत प्रसिद्ध केलेल्या बातम्यांनाही बाळासाहेब पाटील यांनी पाठिंबा दर्शवत कामातील त्रुटींवर ठाम भूमिका मांडली. हे आंदोलन म्हणजे केवळ रस्त्याच्या प्रश्नावरचे आंदोलन नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उफाळून आलेला जनक्षोभ असल्याचे चित्र तासवडे येथे पाहायला मिळाले.

Satara News: कास-ठोसेघरच्या डोंगररांगांत ‘रानमेव्या’चा दरवळ! रानमेव्याची चव चाखण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Web Title: Balasaheb patil protest tasawade toll mayani pandharpur road work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • balasaheb patil
  • Satara News

संबंधित बातम्या

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे
1

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा
2

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
3

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक
4

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.