Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका

विजयानंतर बोलताना ॲड. मिलिंद थोबडे यांनी राज्यातील सर्व वकिलांचे आभार मानले. वकिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र वकील संरक्षण कायदा मंजूर व्हावा यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 06, 2026 | 07:34 PM
ॲड. मिलिंद थोबडे यांचा 'हॅट्ट्रिक' विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका

ॲड. मिलिंद थोबडे यांचा 'हॅट्ट्रिक' विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका

Follow Us
Follow Us:

Bar Council of Maharashtra and Goa : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर झाला असून सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांनी दणदणीत विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा बार कौन्सिल सदस्यपदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. पहिल्या पसंतीची तब्बल ३,८२९ मते मिळवत ते राज्यातील पाचव्या क्रमांकाने विजयी ठरले.

बार कौन्सिलच्या २३ सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीत राज्यभरातील सुमारे एक लाख वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. १५५ उमेदवारांमधून निवड झालेल्या विजेत्यांमध्ये ॲड. थोबडे यांनी आपले स्थान कायम राखत पुन्हा एकदा विश्वास संपादन केला.

Chhagan Bhujbal Rajyasabha: छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार! सुनेत्रा पवारांच्या जागेवर महायुतीत

यापूर्वी २०१० आणि २०१९ च्या निवडणुकांमध्येही त्यांनी उल्लेखनीय विजय मिळवला होता. तसेच २०११ आणि २०२२ या कालावधीत त्यांनी Bar Council of Maharashtra and Goa चे अध्यक्षपद भूषविले आहे.

सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सचिव म्हणून कार्यरत असताना ॲड. थोबडे यांनी वकिलांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. वकिलांसाठी विमा व मेडिक्लेम योजना, नवोदित वकिलांना लॅपटॉप व कायदेविषयक पुस्तकांचे वितरण, महिला वकील मेळावे, राज्यस्तरीय कार्यशाळा, क्रिकेट स्पर्धा तसेच गरजू वकिलांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य अशा विविध योजनांमुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली.

महाराष्ट्रातील 15000 सोयाबीन शेतकऱ्यांसाठी ADM 5 लाख डॉलर्सची गुंतवणूक करणार; पुनरुत्पादक शेतीला मिळणार बळ

विजयानंतर बोलताना ॲड. मिलिंद थोबडे यांनी राज्यातील सर्व वकिलांचे आभार मानले. वकिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र वकील संरक्षण कायदा मंजूर व्हावा यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवोदित वकिलांना सक्षम बनविणे, त्यांच्या व्यावसायिक अडचणी सोडविणे आणि वकिलांच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या विजयामुळे सोलापूरच्या विधी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध बार असोसिएशन्स आणि विधिज्ञांकडून ॲड. थोबडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Web Title: Bar council election 2026 solapurs adv milind thobde wins for the third consecutive time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • Breaking News
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • Solapur News

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.