Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटाला ‘मिसिंग लिंक’ची गरज! वाढती वाहतूक अन् विमानतळाच्या पुरंदर पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गाची मागणी

Pune-Saswad Road Dive Ghat Missing Link: पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटात वाढती वाहतूक आणि दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, केवळ रुंदीकरणाऐवजी ‘मिसिंग लिंक’ गरज असल्याची मागणी जोर धरत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 15, 2026 | 07:17 PM
Pune-Saswad Road Dive Gha

Pune-Saswad Road Dive Gha

Follow Us
Follow Us:
  • पुणे-सासवड मार्गाला सक्षम पर्यायाची गरज
  • दिवे घाटाला बोगद्याचा पर्याय हवा
  • वाढती वाहतूक, दरडींचा धोका अन् विमानतळाचे आव्हान
अमोल तोरणे

बारामती : पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटात वाहतूक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी आता ‘मिसिंग लिंक’ उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गांतर्गत दिवे घाटाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असले, तरी केवळ रस्ता रुंद करून वाहतुकीच्या भविष्यातील समस्या सुटणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घाटातील डोंगरांचे स्वरूप, दरडी कोसळण्याची संभाव्य भीती आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता, या मार्गासाठी दीर्घकालीन पर्यायाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

पाणीकपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा…; मनसेचे पुणे महापालिका प्रशासनाला निवेदन

दिवे घाट हा पुणे-सासवड मार्गावरील महत्त्वाचा आणि वर्दळीचा घाट आहे. या मार्गावरून जेजुरी, बारामती, फलटण आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. धार्मिक पर्यटन, औद्योगिक वाहतूक, मालवाहतूक आणि दैनंदिन प्रवासामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत घाटाचे रुंदीकरण करताना डोंगरांच्या कड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोदकाम झाल्यास भविष्यात दरड कोसळण्याचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोकणातील आंबोली घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. दिवे घाटातही भविष्यात अशा स्वरूपाच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी आतापासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. घाटातील भूगर्भीय परिस्थितीचा अभ्यास करूनच रुंदीकरण आणि संरक्षणाची कामे केली जात आहेत का, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

दुसरीकडे, पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पामुळे या परिसरातील पायाभूत सुविधा आणि दळणवळणाचे महत्त्व भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. विमानतळाच्या कामाला गती मिळाल्यानंतर पुणे-सासवड परिसरात वाहनांची वर्दळ वाढू शकते. त्यामुळे आजच्या वाहतुकीचा विचार करून नव्हे, तर पुढील काही दशकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या धर्तीवर दिवे घाटासाठीही पर्यायी बोगदा किंवा स्वतंत्र जोडमार्ग उभारण्याच्या शक्यतेचा अभ्यास व्हावा. यामुळे घाटातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास, प्रवास अधिक सुरक्षित होण्यास आणि भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होऊ शकते. दिवे घाटाचे रुंदीकरण हा तात्पुरता उपाय ठरू नये; भविष्यातील सुरक्षित आणि सक्षम दळणवळणासाठी ‘मिसिंग लिंक’चा पर्याय गांभीर्याने तपासण्याची गरज आहे.

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू

Web Title: Pune saswad road dive ghat missing link project demand pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • baramati
  • Dive Ghat
  • Missing Link Project
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory News: ‘सोमेश्वर’चा भोंगा वाजला!; दुष्काळाच्या सावटात ६५ व्या गाळप हंगामास सुरुवात
1

Someshwar Sugar Factory News: ‘सोमेश्वर’चा भोंगा वाजला!; दुष्काळाच्या सावटात ६५ व्या गाळप हंगामास सुरुवात

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
2

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
3

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.