बारामतीकरांनो पाणी जपून वापरा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद झाल्याने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा
बारामती शहरातील पाटस रिंगरोड येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणा-या पाणी पुरवठ्याचे नियोजन खालील प्रमाणे शुक्रवार (१९ जून) रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही.
यामध्ये म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिध्दार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस इंदापुर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर, जवाहरनगर, पोष्ट रोड, हंबीर बोळ छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड विजयनगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड वसंतनगर, अवधुतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी विवेकानंदनगर अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, महादेव मळा, सदगुरुनगर, पतंगशाहनगर, मेडदरोड क्षत्रियनगर श्रावण गल्ली कोष्टी गल्ली तांदुळवाडी वेस चौक सिध्देश्वर गल्ली मारवाड महावीर पथ, बुरुड गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक कसाब गल्ली कचेरी रोड याचा समावेश आहे. शनिवारी (२० जून) रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही.
यामध्ये संपुर्ण कसबा फलटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड हनुमान नगर माळेगाव कॉलनी, सातव वस्ती, शिवाजी नगर, जामदार रोड, कारभारी नगर, सावतामाळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशिल नगर, साठेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड खंडोबानगर नवीन मोरगाव रोड संपूर्ण , या भागाचा समावेश आहे.
बारामती शहरातील सायली हिल व जळोची येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणा-या पाणी पुरवठ्याचे नियोजनानुसार, शुक्रवार (१९ जून) रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही. यामध्ये रुई संपूर्ण, डेरेवस्ती, सायली हिल, सुर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, बावळे वस्ती, तान्हाई नगर, महिला सोसायटी, प्रगतीनगर या भागांचा समावेश आहे.
शनिवार दिनांक २० जून रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही. यामध्ये तांदुळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, निरा कॅनॉल सोसायटी, दुधसंघ सोसायटी या भागाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा साठा करुन पाणी काटकसरीने वापरुन नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे. निरा डावा कालव्यामध्ये पाण्याचे आवर्तन सुटेपर्यंत बारामती शहरात दिवसात पाणीपुरवठा होणार असल्याचे मुख्याधिकारी भुसे यांनी सांगितले.






