Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बावधन गटातील शाळांचा शैक्षणिक दर्जा जिल्ह्यात अव्वल करणार; ऋतुजा शिंदेंचा निर्धार

बावधन जिल्हा परिषद गटातील शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि शाळांच्या पायाभूत सुविधांवर समितीचा भर राहणार आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 10, 2026 | 10:12 PM
satara news

satara news

Follow Us
Follow Us:

वाई- परखंदी (ता. वाई) हायस्कूल येथे शुक्रवार दि. ०७ रोजी बावधन जिल्हा परिषद गटाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या सदस्यांची नियुक्ती व पहिली बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती देणे आणि शाळांमधील गुणवत्ता वृद्धीसाठी प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत, प्रतिमा पूजन, ईशस्तवन तसेच प्रास्ताविक झाले. शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ बाळेकर यांनी समितीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. यानंतर शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे आणि शिक्षक-पालक सहभाग अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. कार्यक्रमात पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शिक्षणाच्या गुणवत्तेला नवे बळ देण्याचा संदेश देण्यात आला.

Satara Fire : विद्यार्थ्यांची वेळ टळली, अनर्थ टळला; सेंट पॉलच्या कॅन्टीनमध्ये आगीचा भडका

या बैठकीस समितीच्या अध्यक्षा ऋतुजा विराज शिंदे (सभापती – महिला व बालकल्याण जिल्हा परिषद सातारा),  प्राथमिक जिल्हा शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी, माध्यमिक जिल्हा शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे, समितीचे सदस्य सचिन भोसले पाटील (पंचायत समिती सदस्य – वाई), गट शिक्षण अधिकारी हर्षवर्धन मोरे, समिती सदस्य शंकर गाढवे (सरपंच – बोपर्डी), परशुराम मांढरे, अभिजीत शिंदे, प्रतीक पिसाळ, दत्तात्रेय ढेकाणे, शरद यादव, संभाजी जाधव, सुशीला यादव, कविता नेवसे, निर्मला भांगरे, वीरधवल भिलारे, नवनाथ मालुसरे, समितीचे सचिव साईनाथ वाळेकर, प्रसाद यादव यांच्यासह बावधन  गटातील सर्व शिक्षक, स्कुल कमिटीचे अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, नवीन शाळेच्या खोल्या बांधणे,शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करणे तसेच शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Satara : वाईच्या आठवडी बाजारात अस्वच्छ पाण्यात भाजी धुण्याचा प्रकार; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

“शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी, गुणवत्तेचा नवा अध्याय” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Web Title: Bavdhan group schools educational quality development rituja shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

कराडमध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठक; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
1

कराडमध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठक; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

Satara Fire : विद्यार्थ्यांची वेळ टळली, अनर्थ टळला; सेंट पॉलच्या कॅन्टीनमध्ये आगीचा भडका
2

Satara Fire : विद्यार्थ्यांची वेळ टळली, अनर्थ टळला; सेंट पॉलच्या कॅन्टीनमध्ये आगीचा भडका

Satara : वाईच्या आठवडी बाजारात अस्वच्छ पाण्यात भाजी धुण्याचा प्रकार; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
3

Satara : वाईच्या आठवडी बाजारात अस्वच्छ पाण्यात भाजी धुण्याचा प्रकार; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप
4

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.